नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आफ्रिकन सुपारी, तंबाखू व फळांवर केल्या जात असलेल्या रासायनिक प्रक्रियेवर बंदी घाला

* रा. काँ. ची मागणी

* अन्न व औषध पुरवठा मंत्री झिरवाळ यांना दिले निवेदन

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- सुनील मैदिले

नागपूर :- आफ्रिकन सुपारी, सुगंधित तंबाखू, अनार, पायनापल, टरबूज, केळी, आंबे इत्यादीवर केल्या जात असलेल्या रासायनिक प्रक्रियेवर बंदी घालण्याची मागणी अन्न व औषध पुरवठा मंत्री नरहरी झीरवाड यांच्याकडे नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली.
आफ्रीकन देशामधुन नागपुर शहरात अवैध मार्गाने सुपारी आणुन येथे त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. नंतर सुगंधित तंबाकासह बाजारात विकण्यात येते. सोबतच कळमना व संतरा मार्केट येथे केळी, आंबे, अनार, पायनापल, तरबुज इत्यादी फळात इंजेक्शन च्या माध्यमातुन रासायनिक प्रक्रिया करुन बाजारामध्ये विकल्या जाते. ही फळे खाल्ल्याने नागरिकांना कॅन्सर सारखे जीवघेणे आजार जळतात. नागपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची पाहणी केल्यास कित्येक जण जिवघेण्या आजाराचा सामना करीत असल्याचे निदर्शनास येते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. सुपारी, तंबाकू व फळांवर रासायनिक प्रक्रिया करुन ते बाजारात विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे अधिकाऱ्यांशी साठेलोटे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात नाही. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन खाद्य पदार्थ व फळांत केमिकेलचा वापर तसेच सुपारी, सुगंधित तंबाकु विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली. नुकतेच ना. नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन त्यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी प्रदेश महासचिव रमण ठवकर, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, विशाल खांडेकर, तानाजी वनवे, जानबा मस्के, राजाभाऊ टाकसांडे, सुशांत पाली, सोहेल सहानी, विशाल पाटील, सचिन उके, दयाशंकर दुबे, राजेश पाली, समीर राहाटे, वसीम पटेल, राजू पठाण अशफाक खान, नागेश डेडमुठे, राहुल कांबळे, राजू मिश्रा, एकनाथ फलके, अभीदत्त फाले, बंटी गंडेचा, कनीजा बेगम, मुमताज बाजी, विशाल गोंडाणे, दिनेश रोडके, आशिष मदान, यशस्वी बनसोड, किरण नंदनवार, रवि वाठ, लक्ष्मणराव बाळबुदे, विजय गावंडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!