सतत सतरा वर्षा पासून अविरत चालू आहे उपक्रम
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🗞️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मुर्तिजापुर ( ता. प्र.) 2007 पासून प्रारंभ झालेल्या नेहरु युवा मंडळ, मुर्तिजापुर च्या ” पाणेरी पाखरांची” या अभियानाचे श्री संत गाडगेबाबा यांच्या जन्मोत्सवांतर्गत मा. कृष्णा दादा अंधारे जिल्हाध्यक्ष रा. कां. पा. अजित पवार गट यांच्या व गाडगेबाबांचे पणतू सतिश भाऊ सनोने यांच्या उपस्थितीत उदघाटन होऊन श्री संत गाडगेबाबा स्मारक बहूउद्देशीय स़ंस्थेचे अध्यक्ष राहूल भाऊ तिडके यांच्या हस्ते निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वास्तव्याने पुनित पावण बाबांच्या झोपङी परिसरात गौरक्षण येथे झाडावर लावून झाले.
श्री संत गाडगेबाबा यांचा जन्म महाशिवरात्री चा असल्याने मुर्तिजापुर येथिल स्मारक समिती व्दारा गेल्या 35 वर्षापासून जन्मोत्सव साजरा केला जात असतो. याच जन्मोत्सवात गाडगेबाबांचे दससुत्रीतील दोन संदेशाचे पालन म्हणून पशू पक्षा़ना अभय आणि पाणि वर लक्ष केंद्रीत करुन नेहरु युवा मंडळ, मुर्तिजापुरचे अध्यक्ष अनिल डाहेलकर या़च्या संकल्पनेतून अविरत चालेल्या अभियानाचे दिवंगत युवा संत भैय्युजी महाराज यांनी करुन पाखरासाठी पाणपोया लावण्याचे आवाहन करुन जणू कौतुकाची थापच दिली तर उमेश अलोने यांच्या माध्यमातून झी मराठी ने तेव्हा आपल्या बातमीतून सव्वा चार मिनिटाचे कवरेज देवून या उपक्रमास भारतभर पोहचविण्यास मदत केली तर विदर्भातील सर्वच वृतपत्रांनी ही अबाल वृध्दा़प्रयंत पोहचून त्याच्या मनात दया भाव जागृत करुन या अभियानास सफल केले. आता गावोगावी खेडोपाडीच नव्हे तर मोठ मोठ्या शहरात ही लोक पशु पक्षा़साठी पाण्याची सोय करतात हेच या आमच्या छोट्याश्या स़कल्पित अभिमानाचे मोठे फलित असल्याचे मत अभियानाबाबत माहिती देताना अनिल डाहेलकर यांनी व्यत केले.
या वेळी स़त गाडगेबाबा स्मारक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक:सुभाषराव टाले, कार्याध्यक्ष : अरविंद तायडे,
बाळासाहेब निंबाळकर, निपेश चाहकर, पंकज धबाले, रितेश उंबरकर, संतोष शहाकर, रितेश शेंदरकर तसेच राष्ट्वादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जगदीश मोरोडकरं, शहर अध्यक्षअमोल लोकरे, पंचायत समिती सदस्य सिद्धु तायडे, उद्ल जाधव,अशिष तिडके,मुकुंद बांबल आदींची उपस्थिती होती.



