DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️✍️ 🚨 दर्शन पोलिस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी
उमरेड :- रेतीमाफीया, पोलिस अधिकारी, इतरही अधिकारी व कर्मचा-यांच्या नाकीनऊ आणणा-या ‘आर’ गँगमुळे सर्वञ संताप व्यक्त होत आहे. भाजपमधील या ‘आर’ गँगच्या मुसक्या कोण आवळणार? असा प्रश्न पडला आहे.
रेतीची अवैध वाहतूक सुरू करण्यासाठी भाजपमधील ‘आर’ गँगच्या ‘पाटलाने’ राष्ट्रवादी ‘बापलेकांना’ सोबत घेत, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिका-यावर दबातंञ आणले आहे. यासाठी खोट्या तक्रारी केल्या जात आहे. याबाबत वृत्तपञात बातम्या प्रकाशीत होताच, ‘आर’ गँगचे धाबे दणाणले आहे. सर्वञ चर्चा पसरताच, ‘तो मी नव्हेच’ असे सुध्दा ही ‘आर’ गँग ठासून आणि हासुन सांगत आहे. पक्षातील वरिष्ठांकडे तक्रारी झाल्यास आपली हकालपट्टी होणार? याचा अंदाज असल्यामुळे ‘आर’ गॅंगने आता रेतीघाटाचा नाद सोडून जिल्हा परिषदेचा हात पकडला आहे. पदाधिका-यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेवर प्रशासक बसले आहे. त्यामुळे ‘साहेबांनी’ आम्हाला जिल्हा परिषदेकडे लक्ष देण्याच्या सुचना दिल्या आहेत. असे सांगत ‘आर’ गँगकडून आता जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कंञाटदार यांच्या बैठका घेणे सुरू आहे. कुठलेही पदसीध्द पद नसतांना ही ‘आर’ गॅंग डीपीडीसीचा निधी खिरापती सारखा वाटायला निघाले आहे. त्यासाठी कंञाटदारांना दम दिल्या जात आहे. त्यामुळे या ‘आर’ गँगच्या मुसक्या कोण आवळणार असा प्रश्न नागपूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात विचारला जात आहे.
—->
‘आर’ टोळीचे म्होरके ‘पाटील’ यांच्या उपद्व्यापांची माहिती पक्षातीलच एका व्यक्तीने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याची दखल घेण्यात आली असून, लवकरच ‘आर’ टोळीच्या कृत्याची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.



