नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चंदगड तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत, कारवाई आवश्यक, अन्यथा मोर्चा काढणार.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी:- संदीप सकट

कोल्हापूर:- चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या अकार्यक्षम कारभाराने, आर्शिवादाने चंदगड तालुक्यात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून विश्वास पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा सामजिक कार्यकर्ते व अँड. संतोष मळवीकर यांनी दिला. तशा आशयाचे निवेदन दि. 8 मार्च रोजी चंदगडवासियांनी पोलिस उप अधीक्षक रामदास इंगवले यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, चंदगड तालुक्यात देशी आणि गोवा दारू, मटका, जुगार, क्लब, मावा असे अवैध व्यवसाय आणि गुंडागर्दी वाढली आहे. तालुक्याच्या गल्लीबोळात हे सर्व अवैध धंदे सुरू आहेत. शिनोळी फाटा, चंदगड,पाटणे फाटा, राजगोळी, हलकर्णी औद्योगिक वसाहत आणि शिरगाव फाटा येथे जुगार,मटका तीन पाणी बेकायदेशीर क्लब चालू आहेत.
तिलारी घाटातून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांनी तर धुमाकुळ घातला आहे. यासंदर्भात वेळोवेळी निरीक्षक पाटील यांना कल्पना दिली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. जाणीवपूर्वक अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदकांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असताआर्थिक लाभासाठी पाटील स्वतः अवैध धंद्याच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. तालुक्यात कायदा व व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.निवेदनाद्वारे त्यांनी असाही आरोप केला आहे की वरिष्ठ म्हणून आपल्यालाही याबाबत कल्पना दिली आहे. पण कोणतीही कारवाई दिसून आली नाही. आजही त्यांनी अवैध व्यवसायाशी संबंधित पुरावे दाखवले. यानंतर याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास पोलिस उप अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असे मळवीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर मळवीकर यांच्यासह भरत गावडे, सुनील नाडगौडा, मारुती दळवी, परशराम मळवीकर, अनित गावडे, ज्ञानेश्वर माने, काशीनाथ कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!