DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- दिप्ती पाटील
उरण :– महिला सक्षमीकरण आणि मानवता सक्षमीकरण हे ब्रीदवाक्य असलेली हि वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा म्हणजेच आजारांचे निदान, उपचार आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवेला वैद्यकीय सेवा म्हणतात .आणि या अशा वैद्यकीय सेवेमुळे एखाद्या व्यक्तीचे आरोग्य तर उत्तम होतेच पण त्या व्यक्तीला जीवनदान मिळते. डॉक्टर रुग्ण यांच्यातील हे नाते विश्वास, आदर, संवाद यावर आधारलेले असते.
अशा या वैद्यकीय सेवेचे इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आय.सी.टी.सी.) यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन कडून ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती आणि मोफत थर्मल मेमोग्राफी शिबिराचे आयोजन हॉटेल भोईर गार्डन कोट नाका उरण येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. डॉ. घनश्याम पाटील (अध्यक्ष उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) डॉ. सलील पाटकर (आय.सी.टी.सी वाशी आणि पनवेल) डॉ. सत्या ठाकरे (सेक्रेटरी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) डॉ. सचिन गावंड (खजिनदार उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे उरण मधील महिलांच्या विविध सामाजिक संस्था वुमेन ऑफ विस्डम सामाजिक व शैक्षणिक संस्था उरण, कुटुंबिनी महिला संघ उरण, कलश इंटरटेनमेंट, माई फाउंडेशन, पत्रकार उत्कर्ष समिती, स्वर्गीय तृप्ती सुधीर सुर्वे फाउंडेशन, महालन सामाजिक संस्था उरण, आधार फाउंडेशन या संस्थांचा यामध्ये सहभाग होता.
डॉ. संगीता डाके (एमडी गायनोलॉजिस्ट) डॉ. मोना बोरकर (एमडी) (गायनोलॉजिस्ट) डॉ. कृष्णा बोरकर (ग्यानॅकॉलोगीस्ट) डॉ. रंजना म्हात्रे (कन्सल्टंट सेक्रेटरी) डॉ. शुभांगी मोकल (कन्सल्टंट सेक्रेटरी) डॉ. सुलोचना पाटील, डॉ. राणू ठाकरे, डॉ.प्राजक्ता कोळी, डॉ. दया परदेशी, डॉ सविता ढेरे, डॉ वनिता पाटील या महिला डॉक्टरांनी या शिबिरासाठी महत्वाचे योगदान दिले…
उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन चे पेट्रोन डॉ सुरेश पाटील सर व डॉ मंगेश डाके सर हे मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरात पुर्ण वेळ उपस्थित होते.



