DPT NEWS NETWORK 🗞️📹✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर
( दिलासा ग्रुपच्या वतीने महिलांचा सत्कार, राजमुद्रा ग्रुप यांचे विशेष सहकार्य, रेड क्रॉस आजीवन सदस्यांचा सत्कार )
तुमसर:- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संताजी सभागृह तुमसर येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडाराचे वतीने आजीवन सदस्य श्रीमती मीरा भट्ट द्वारा आयोजित महिलांचा सत्कार व निराधाराना मदत साहित्य किटचे वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता रेड क्रॉसचे उपाध्यक्ष, प्रमुख अतिथी डॉक्टर नितीन तुरसकर सेक्रेटरी, राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर गभने, महिला अध्यक्ष मीनल लिमजे, प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या बी.के. शक्ती दिदी, डीएमआय संस्थेच्या संदना सिस्टर, डॉक्टर रुद्रसेन भजनकर यांची उपस्थिती होती.
तुमसर विभागातील नवनियुक्त आजीवन सदस्य रितू पशिने, प्रीती तंगडपल्लीवार, अर्चना डुंबरे यांचा रेड क्रॉसच्या वतीने तसेच महिला दिनानिमित्त दिलासा ग्रुप यांचे वतीने डॉक्टर जयपूरकर मॅडम, रेणू गिडीयम मॅडम यांचेसह पुष्पकळी देऊन 50 महिलांचा सत्कार करण्यात आला.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडाराची वतीने तुमसर विभागातील 45 निराधार महिलांना मदत साहित्य किटचे वाटप रेड क्रॉस चे डॉक्टर गुप्ता, डॉक्टर तुरस्कर, सेवक रामजी शाहू, वासुदेव निर्वाण, डीएम अतकरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक व संचालन साहित्यिक राजूभाऊ खवसकर, आभार आयोजक श्रीमती मीरा भट्ट यांनी केले.
मदत साहित्य वाटप कार्यक्रमाकरिता राजमुद्रा ग्रुपचे शुभम बाणासुरे, राहुल रणदिवे, पल्लवी निनावे, गीता कोंडेवार, नेहा मोटघरे, करुणा धुर्वे, पाम ठाकूर, रितू पसीने, यांचेसह सौ पद्म खवसकर, सौ. श्वेता शिंगाडे यांचे योगदान लाभले.



