नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तुमसर येथे राजमुद्रा ग्रुप तर्फे महिला दिन उत्साहात साजरा

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- डॉ सुखदेव काटकर

तुमसर:- संपूर्ण देशामध्ये ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. राजमुद्रा ग्रुप तर्फे दरवर्षी तुमसर शहरामध्ये महिला दिन महिलांचे विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो.
यावर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना मान देण्यात आला.
संताजी सभागृहात आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध सेवाभावी महिला संघटना प्रामुख्याने उपस्थित होत्या त्यात तुमसर येथील लोकमत सखी मंच,ग्लोरी झुंबा फिटनेस क्लब,वी क्लब,इंडियन रेडक्रॉस फेडरेशन भंडारा,वुमन्स राईट फेडरेशन,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन,सर्व महिला बचत गट,ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय,जेसीआय तुमसर, उडान,जिजामाता महिला मंडळ यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणू गिडियन प्रमुख अतिथि डॉ.अर्चना जयपुरकर,शक्ती दीदी,डी.वाय संधना सिस्टर, सिंधुताई , निशा सार्वे, संदना सिस्टर ह्या होत्या.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमत सखीमंच तालुकाध्यक्ष रितु पसीने यांनी केले प्रास्ताविक राजमुद्रा ग्रुप महिला मंडळाचे अध्यक्षा मीनल निमजे यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता राजमुद्रा ग्रुप महिला मंडळाच्या गीता कोंडेवार पमा ठाकुर,नेहा मोटघरे,करुणा धुर्वे,पल्लवी निनावे,जयश्री गभने,अश्विनी बड़वाईक,कविता तितिरमारे,

यांनी पुढाकार घेतले व संपूर्ण राजमुद्रा ग्रुप महिला मंडळ, महिला भगिनी व राजमुद्रा ग्रुपचे मावळ्यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मीरा भट यांनी केले.
…………………………………..
*वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन*

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राजमुद्रा ग्रुप तर्फे पोलीस स्टेशन तुमसर या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी अनेक झाडे लावण्यात आले.प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूला वृक्ष लावायला हवे याने वायू शुद्ध होते आणि आपले स्वास्थ सुद्धा ठीक राहते ह्या उद्देशातून राजमुद्रा ग्रुप तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
……………………………..

*ह्या महिला ठरल्या सत्कारमूर्ती*

यांना राजमुद्रा ग्रुप तर्फे सन्मानित करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शासकीय खात्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
*सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांच पुढाकार*

महिला दिनानिमित्त राजमुद्रा ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पोवाडे,देशावर आधारित, थोर पुरुषांवर आधारित नाटिका/ सांस्कृतिक/कार्यक्रम/पोवाडे आयोजित करण्यात आले होते.यात महिलांनी सहभाग घेत सरगम ग्रुप, युगल ग्रुप,शिवमुद्रा ग्रुप, आंशिक सुखदेवे ग्रुप, निर्मला हटवार ग्रुप व महिलांचे विविध ग्रुप च्या महिलांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे सादरीकरण केले या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलांना राजमुद्रा ग्रुप तर्फे भेट वसु देऊन सन्मानित करण्यात आले.
……………………..
*निराधार महिलांना किट वाटप करत केला त्यांचा सत्कार*

राजमुद्रा ग्रुप आयोजित महिलांचा सत्कार कार्यक्रमात इंडियन रेड क्रॉस संस्था भंडारा व राजमुद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील ४५ निराधार महिलांना किट वाटप करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंडियन रेटक्रॉस संस्थेचे…………. राजमुद्रा ग्रुप चे …………………उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!