नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेर बंद

जिवंत बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीकरिता घेवून आलेल्या चंदगड येथील दोन इसमांना पकडून अमुल्य किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव

कोल्हापूर:- मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित साो, यांनी वन्यजीव प्राणी तस्करीचे अनुषंगाने माहिती काढून प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले होते.

मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सदर पथक वन्यजीव प्राणी तस्करीची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, चंदगड येथे बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्री करिता दोन इसम तपोवन मैदान, कोल्हापूर येथे सी.डी. डीलक्स मोटर सायकल वरून येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. मिळाले बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता दोन इसम सी.डी. डिलक्स मोटर सायकलवरून कळंबा रोडने तपोवन मैदान येथे आले त्यांचे गाडीवर एक प्लॅस्टिक पोते होते. मिळाले बातमीची खात्री झालेवर पथकाने त्यांना छापा टाकून पकडले.

सदर इसमांना नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून विचारले असता त्यांनी त्यांची नावे १] बाबु सखाराम डोईफोडे, वय ५७ वर्षे, रा. बांदराई धनगरवाडी, तिलारी नगर, ता. चंदगड, जिल्हा कोल्हापूर २] धाकलू बाळु शिंदे, वय ६५ वर्षे, रा. रोहीदास गल्ली, हेरे, ता. चंदगड, जिल्हा कोल्हापूर अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडील प्लॅस्टिक पोत्याची वनविभागाचे अधिकारी व दोन पंचा समक्ष पाहणी केली असता त्यामध्ये बिबट्याचे कातडे मिळून आले. सदरबाबत कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे कब्जातून विक्रीकरिता आणलेले अमुल्य किंमतीचे बिबट्याचे कातडे, ४०,०००/- रूपये किंमतीची मोटर सायकल व १०,०००/- रूपये किंमतीचे ०२ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ५०,०००/- रूपयेचा माल जप्त करणेत आला आहे. राजवाडा पोलीस ठाणेस वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर इसमांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, संतोष बरगे, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, यशवंत कुंभार व वन विभागाचे अधिकारी राजेंद्र उलपे, प्रमोद पाटील, रणजित पाटील यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:31 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!