नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चांदीच्या टंचात १०लाख ४५ हजाराची व्यापाराची फसवणूक दोघे अटक – राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

DPT NEWS NETWORK 🗞️📹✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे कोल्हापूर

कोल्हापूर:- कोल्हापूरातील चांदी व्यापाराची दहा लाख पंचेचाळीस हजार रुपयेची फसवणूक केले प्रकरणी रेंदाळातील दोघांचे वर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाणे कडून मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी कल्पेश मानिकचंद ओसवाल, वयं 40 वर्षे, धंदा चांदी कारागीर, रा. 2804, बीवॉर्ड, भक्तीपुजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर व आरोपी धनंजय दिलीप पाटील, व.व.26, धंदा चांदीकाम, रा. माने नगर, रेंदाळ, ता. हातकणंगले,सचिन शिवाजी सादळे व.व. 27, धंदा-दुध व्यवसाय रा. अंबाबाई नगर, रेंदाळ, ता. हातकणंगले, कोल्हापूर हे चांदीचे व्यापारी आहेत. फिर्यादी व आरोपी यांनी चांदीच्या दागिन्यांच्या मोबादल्यात चोख चांदी दिली जाते. यातील आरोपी यांनी फिर्यादी यांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने त्यांचा विश्वास जिंकुन त्यांचे कडून 15 किलो 375 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घेऊन त्या बदल्यात फिर्यादींना 13 किलो 69 ग्रॅम चोख चांदी [100 टक्के टंच असलेली] देणे आवश्यक असतांना आरोपी यांनी त्यांचेकडील चांदी कमी प्रतीची [20 टक्के टंच असलेली] असल्याचे त्यांना माहित असुन देखील चांदी ही पुर्ण शुध्द [100 टक्के टंच] असल्याचे भासवून ती फिर्यादी यांना देवून त्यांची एकुण 10 लाख 45 हजार 520 रुपयांची फसवणुक केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राजारामपूरी पोलीस ठाणे मध्ये 157 /2025 बीएनएस कलम 318 [4], 316[2], 3[5] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस सब इन्स्पेक्टर चंदन हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:29 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!