नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वैजनाथ देवस्थानच्या पुरोहिताने तणनाशक पिऊन जीवनयात्रा संपवली.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव

कोल्हापूर :- श्री वैजनाथ (देवरवाडी, ता. चंदगड)देवस्थानचे पुरोहित वेदमूर्ती प्रमोद प्रभाकर बर्वे वय वर्ष 32 यांनी मंगळवारी दि. 18 मार्च च्या रात्री तणनाशक प्राशन केल्याची घटना घडली तातडीने त्याला उपचारासाठी बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान दि सोमवारी दि 24 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, वैजनाथ देवस्थानचे पुरोहित प्रमोद बर्वे यांना काही सावकारांनी पैशासाठी तगादा लावला होता. सावकारी जाचाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. त्यातूनच नैराश्यपोटी त्यांनी तणनाशक प्राशन केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. यातून अवैध सावकारशाही चा विळखा किती घट्ट रुजला आहे व भविष्यात अजून किती जणांना यातून जीव गमवावा लागणार आहे हे येणारा काळच स्पष्ट करेल. याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात आत्महत्या अशी तक्रार नोंद झाली आहे, अद्याप कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. वेदपंडित, वेदमूर्ती असलेल्या एका पुरोहिताच्या आकस्मिक जाण्याने देवरवाडी पंचक्रोशीतील व चंदगड तालुक्यातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!