DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बऱ्याच तपासानंतर तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. एकीकडे पोलिसांकडून शोध घेतला जात होता तर दुसरीकडे तो दुबईला गेल्याची चर्चा रंगली होती.
त्याला पोलिसांकडून तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत कोरटकरचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तो कॉल माझा नव्हता, असा दावा त्याने केला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. अखेर आज त्याला अटक केली आहे. कोरटकरने अगोदर कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. उच्च न्यायालयातही कोरटकरचा जामिनासाठीचा केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता.
गुन्हयातील पाहिजे आरोपी प्रशांत कोरटकर यास स्थानिक गुन्हे शाखा व जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे संयुक्त पथकाने दिनांक २४/०३/२०२५ रोजी दुपारी ०२.४५ वाजता मंचरियाल, राज्य तेलंगणा या ठिकाणी ताब्यात घेतले.
आरोपी प्रशांत कोरटकर यास कोल्हापूर येथे आणताच पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यास दिनांक २५/०३/२०२५ रोजी मा. न्यायालयात हजर करणेत येणार आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जुना राजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, सुशील पाटील तसेच पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव खोत, निलेश नाझरे, अतुल देसाई, रोहत टिपुगडे यांचे पथकाने केलेली आहे.



