DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨छायाचित्रकार – अशोक घाग
ठाणे: गहाळ झालेले तब्बल 101 मोबाईल फोन तीन महिन्यांत संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी नौपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी केली आहे.
नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल संच गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी दिल्यामुळे त्याबाबत तपास सुरु केला होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पथक स्थापन करुन मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, नौपाडा पोलीस स्टेशन मधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणा द्वारे शोध सुरु केला गहाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती तत्काळ सी.ई.आय.आर पोर्टलवर अपडेट करुन सातत्याने त्याचा पाठपुरावा करुन तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत 101 गहाळ झालेल्या विविध कंपन्याचे मोबाईल फोनचा शोध घेतला आणि ज्यांचे मोबाईल गहाळ झालेले होते त्यांना आज परत करण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (प्रशासन) सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)शरद कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलीस अंमलदार करणकुमार पाटील,, अशोक कोल्हे, प्रतीक बावणे, गंगाधर तीर्थकर यांनी केली.



