नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मूर्तिजापूरात अनैतिक संबंधच्या संशया वरून युवकाचा कुऱ्हाडीने खून..!

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

मूर्तिजापूर :- मूर्तिजापूर येथील सिरसो गायरन परिसरात अनैतिक संबंधा च्या संशया वरून एका युवकांची निर्गुण हत्या तर ८ जण गंभीर झाल्याची घटना घडलीये.
. मूर्तिजापूर शहर नजिक हिरपूर रोड वर असलेल्या सिरसो गायरान (पारधी वाडा )परिसरात आज दि. २५ रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशया वरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीये. या घटनेत एका १९ वर्षीय युवकाची कुऱ्हाडीने निर्गुण हत्या करण्यात आली तर या वादात इतर ८ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
. प्राप्त माहिती नुसार रेणुका दयावान घोसले वय ३० वर्ष रा. सिरसो गायरान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भासरे चंदू दामू घोसले हे सदर ठिकाणी त्यांच्या परिवारासह राहतात त्यांना तीन मुलं व एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे. तिचे पती राहुल चव्हाण याचे प्रदीप किशोर घोसले यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला. या वादाचा निपटारा दि २४ रोजी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाले असतांना परत दि. २५ च्या सकाळी सदर वाद पुन्हा उफाळला या वादाचे रूपांतर क्षणातच हाणामारीत होऊन यात १९ वर्षीय सूरज चंदू घोसले रा. सिरसो गायरान या युवकाची कुऱ्हाडीने अमानुष रित्या मानेवर वार केल्याने जागीच मृत्यू झाला. तर इतर सात ते आठ जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारार्थ मुर्तीजापुर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हालवण्यात आले. या घटने मुळे सिरसो गायरन परिसर व श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयास पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:25 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!