नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जन ग्रामीण पत्रकार संघ व वर्किंग जर्नालिस्ट ऑर्गनायझेशन यांचे नागपुरात अधिवेशनाची धडाकेबाज सुरुवात

जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र व वर्किंग जर्नालिस्ट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अधिवेशनाचा पहिला दिवस आनंदात पार पडला.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी :- सुरजितसिंग बाठ

नागपूर:- जन ग्रामीण पत्रकार संघ व वर्किंग जर्नालिस्ट ऑर्गनायझेशनच्या नागपूर विभागाने आयोजित केलेला दोन दिवसीय पत्रकारांचे अधिवेशन त्यापैकी पहिल्या टप्पा अति उत्साहाने पार पडला.
कार्यक्रमात पत्रकारांनी आपले दैनंदिन जीवनात येणारे अनुभव कथन केले. तसेच अमरावती येथील प्रा. डॉ. विनोद निताळे सर यांनी देखील डिजिटल पत्रकारिता व सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात किंवा राज्यातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात काही सेकंदात तर काही मिनिटात पोहोचता येते. व ते आपण कशा पद्धतीने पोहचले पाहिजे कशा पद्धतीच्या बातम्या तयार केल्या पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच Ai टूल्सचे कसा वापर करून युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून जगभरात तसेच राज्यात देशात चालणाऱ्या हालचाली त्यावर बातम्या बनवून प्रकाशित केल्यानंतर जगातील कानाकोपऱ्यात पोहचता येते. याबद्दलच्या काही टिप्स त्यांनी दिल्या. सर्व राज्यातील पत्रकारांनी त्यांचे सेशन शांतचित्ताने ऐकत टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक केले.

राज्यभरातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सूत्रसंचालन जन ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे यांनी केले. राज्यातील पत्रकारांचे कौतुक करत केलेल्या कार्याची दखल घेत जन ग्रामीण पत्रकार संघ व वर्किंग जर्नालिस्ट ऑर्गनायझेशन यांनी मान्यवरांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी मंचावर जन ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रतीक पांडे, नागपूर महिला अध्यक्षा शितल नंदनवार, मुंबई महिला अध्यक्षा भारती पाटील, वर्किंग जर्नालिस्ट ऑर्गनायझेशन चे जिल्हाध्यक्ष तिवारी, महिला सदस्य चांदणी पाठक, गीता शुक्ला,

जनरोड सेफ्टी फाउंडेशनचे हरभजनसिंग नन्हे, दलित मित्र पुरस्कार प्राप्त भगवान खरे, आदिवासी संघटनेचे लढवय्या योद्धा भास्कर दळवी, साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील समाजसेवक बंदिवान कैद्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करणारे संजीव दळवी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय सनदी, पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माने, सांगली जिल्हा अध्यक्ष रमजान मुलानी, विदर्भ समन्वयक हितेश शेठाने, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेळके, विदर्भ उपाध्यक्ष सुरजितसिंग बाठ,
सुनिल मैदीले, अमर मोकाशी, डॉ. सुखदेव काटकर, मिलिंद अवचित इंगळे, सिध्दार्थ वानखडे , डॉ. सुरज गोवर्धन खंडारे, मनोहर गोरगले, अशोकराव टाव्हरे, प्रविण घरबडे, निवास गागडे, नारायण कांबळे, संजय शेंडे, योगेश धामणेकर, सुनिल मैदीले, अमर मोकाशी,डॉ. सुखदेव काटकर, हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!