नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कॉपर केबल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!

300 किलो कॉपर केबलसह 5.40 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपी अटकेत

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी :- प्रविण चव्हाण

नंदुरबार:- भोणे गाव शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधून चोरी झालेल्या कॉपर केबल प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 300 किलो कॉपर केबल हस्तगत केली असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीचा एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी दि. 17 मार्च 2025 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 107/2024 कलम 324(4), 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद राजेंद्र चिंतामण पाटील यांनी दिली होती.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. हॉटेल मोतिलीलाच्या पाठीमागे तय्यब शहा यांच्या गोडाऊनजवळ पांढऱ्या इको वाहनातून कॉपर केबल विक्रीसाठी आणली जात असल्याचे समजल्यावर पथकाने कारवाई केली.

छाप्यात चार संशयित व्यक्ती कॉपर केबल गोण्यांमध्ये लपवून उतरवतांना आढळले.

त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खालील आरोपींची नावे समोर आली:
1. अनिल ऊर्फ मकडू हंबर पाटील (वय 35, रा. शनिमांडळ)
2. ज्ञानेश्वर ऊर्फ भटू पाटील (वय 31, रा. शनिमांडळ)
3. वाहीद रजा ऊर्फ सुलतान पिंजारी (वय 31, रा. रनाळे)
4. तय्यब अय्युब शहा (वय 35, रा. गाझी नगर)
यांनी लखन बापू नाईक (फरार) यांच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यांनी चोरीचा मुद्देमाल सौरव केसरीमल जैन (वय 42, रा. जळका बाजार) याला विक्रीस दिला होता. सौरव जैननेही गुन्ह्याची कबुली दिली असून माल त्याच्या नंदनगरी हाऊसिंग सोसायटीतील घरात साठवून ठेवला होता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने केली.
यामध्ये पोउपनि मुकेश पवार, पोह बापू बागुल, विशाल नागरे, मुकेश तावडे, मोहन ढमढेरे, रमेश साळुंखे, पोकों अभय राजपूत, शोएब शेख, अविनाश चव्हाण, आनंदा मराठे यांनी सहभाग घेतला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:32 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!