नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई!

सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या नेतृत्वात दोन प्रकरणांमध्ये कारवाई, दोन आरोपी ताब्यात.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण

नंदुरबार, दि. 6 एप्रिल 2025 —
अक्कलकुवा उपविभागातील हद्दीत विनापरवाना वाळूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन वाहने जप्त करण्यात आली असून दोघा वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

*पहिली कारवाई – 1 मार्च 2025*

सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड हे पेट्रोलिंग करत असताना तळोदा नाक्याकडून बस स्थानकाकडे जात असलेल्या टाटा हायवा वाहन (क्रमांक HR 46 E 9764) मध्ये संशयास्पदरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
वाहन थांबवून चौकशी केली असता चालक गुमानसिंग लक्ष्मण वसावा (वय 31, रा. मंडारा, ता. अक्कलकुवा) याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी वा बिल कोणतीही उपलब्ध नव्हती.
त्याच्याविरुद्ध गु.र.नं. 118/2025 कलम 303(2), 3(5) अंतर्गत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*दुसरी कारवाई – 2 मार्च 2025*

सहाय्यक पोलीस अधीक्षक दुगड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खापर गावाजवळून एक आयसर डंपर (क्रमांक GJ 6 AZ 8904) वाळूची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.
त्यावर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व त्यांच्या पथकाने तत्काळ खापर चौफुलीवर नाकाबंदी केली. थोड्याच वेळात संबंधित वाहन येताना आढळले आणि थांबवण्यात आले.
वाहनचालक सुनिल रमेश पाडवी (वय 38, रा. महुखाडी, ता. अक्कलकुवा) याच्याकडे देखील कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे समजले. त्याने महाराष्ट्रातून अवैध वाळूची वाहतूक करत असल्याची कबुली दिली.
या प्रकरणी गु.र.नं. 123/2025, कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

*कडक कारवाईचा इशारा*

सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी सांगितले की, “अक्कलकुवा परिसरात कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय व त्यासंदर्भातील चोरटी वाहतूक यावर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.”

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:29 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!