नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रियकराने प्रेयसीवर केले,चाकुने प्राणघातक हल्ला

(तरुणीची प्रकृती चिंताजनक)

(आरोपी पोलिसांच्या ताब्यात)

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे

अकोला :- बोरगाव मंजू येथे प्रेमसंबंधास विवाहाचे स्वरूप नाकारल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकूने सपासप वार करत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ६ एप्रिल रोजी दुपारी बोरगाव मंजू येथे घडली. सध्या प्रकरणे हिंसक वळण घेताना दिसत आहेत. याच प्रकारची एक घटना बोरगात मंजू येथे समोर आली आहे. सोशल प्रभावामुळे प्रेमसंबंधांचे प्रमाण वाढले असले तरी जात, कौटुंबिक अपेक्षा व सामाजिक बंधने या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत आहेत. त्यातूनच काही मीडियाच्या मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २:३० वाजता बोरगाव मंजू येथील नविन बायपास जवळील सोनाळा रस्त्यावर (एमएच २४ व्ही ९९२६) या कारमध्येच प्रेमीयुगुलामध्ये वाद निर्माण झाला. दोघांचे ही प्रेमसंबंध होते. मात्र, विवाहासाठी जात अडथळा ठरत असल्याने तरुणीने नकार दिला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून संतोष प्रकाश डिवरे (रा. जवळा, ता. शेगाव, जि. बुलढाणा) या तरुणाने तिला कारने बोरगाव मंजू शिवारात आणले व तीच्यावर वार केले .
हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्या तरुणाचा पाठलाग करुन त्याला पकड़ले सदर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गावातील तरुणांनी त्याचा दुरवर पाठलाग करीत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिस करीत आहेत.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने रस्ताची वर्दळ कमी आहे. याचा फायदा घेत संतोषने तरुणीवर चाकूने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, जखमी तरुणीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले व पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी तरुणीला तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!