नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत घर फोडून चोरट्यांनी ७२ हजारांचा ऐवज पळविला; चोऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरन

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी :- राजेंद्र पवार

मिरज:- चोरट्यांनी हॉलच्या दरवाजाच्या खिडकीवाटे हात घालून दरवाजा उघडला व आत प्रवेश केला. आतमध्ये ठेवलेली सात हजार रुपयांची रोकड आणि ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. मिरज शहरातील मगदूम मळा परिसरात बंगल्याच्या खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्यांनी ७२ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी दादासाहेब मधुकर चंदनशिवे (रा. मगदूम मळा, पंढरपूर रोड, मिरज) यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (ता.६) रोजी रात्री पावणेबारा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच या कालावधीत हा चोरीची घटना घडली. माजी सैनिक असलेले चंदनशिवे हे मगदूम मळा परिसरात राहण्यास आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हॉलच्या दरवाजाच्या खिडकीवाटे हात घालून दरवाजा उघडला व आत प्रवेश केला. आतमध्ये ठेवलेली सात हजार रुपयांची रोकड आणि ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर चंदनशिवे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!