नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कवठेपिरान येथे शेतजमिनीच्या वादतातून चाकूने बाप-लेकावर खुनीहल्ला; तिघा संशयितांवर गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – रमजान मुलाणी

सांगली (कवठेपीरान) :- पोलिसांनी संशयित हल्लेखोर अभिजित उत्तम देसाई (वय २८), उत्तम शिवा देसाई (५५) आणि अमोल शिवा देसाई (४५ सर्व देसाई गल्ली, नवीन महादेव मंदिरानजीक, कवठेपिरान) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) येथे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीवरून मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून बाप-लेकावर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. यामध्ये जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिर्यादी प्रशांत विष्णू देसाई (वय ३५) आणि त्यांचे वडिल विष्णू शिवा देसाई (वय ६५, कवठेपिरान) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी संशयित हल्लेखोर अभिजित उत्तम देसाई (वय २८), उत्तम शिवा देसाई (५५) आणि अमोल शिवा देसाई (४५ सर्व देसाई गल्ली, नवीन महादेव मंदिरानजीक, कवठेपिरान) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रशांत देसाई आणि संशयित तिघांच्यात वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीवरून वाद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी चुलतभाऊ अरविंद याच्या घरी बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार फिर्यादी प्रशांत आणि त्यांचे वडील विष्णू देसाई अरविंद याच्याकडे जात होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना घराच्या बाहेरच अडविले. यावेळी संशयित अभिजित देसाई याने, ‘कित्येकदा त्याच त्या विषयावर बैठक घ्यायची,’ असा प्रश्न विचारून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी फिर्यादी प्रशांत यांचे चुलते संशयित उत्तम आणि अमोल यांनी देखील त्याच विषयावरून वादावादी केली. यावेळी अभिजित याने फिर्यादी प्रशांत यांच्या कमरेच्या खाली चाकूने वार केला, तर विष्णू देसाई यांना देखील चाकूने भोसकले. जखमी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:12 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!