नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मालगावमध्ये किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 ( मिरज तालुका प्रतिनिधी -प्रविन घरबडे )

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथे मावा खाण्यास देण्यावरून
झालेल्या वादावादीतून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. सचिन वसंत पाटील असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी सचिनचा मित्र आनंदा काडाप्पा बरगाले (शास्त्रीनगर, मालगाव) यांनी सोहेल शाहिद मुजावर (मालगाव) याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (ता. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.जखमी सचिन हा बोलत थांबला असताना फिर्यादी आनंदा हे घरी जाऊया, असे बोलत असताना संशयित सोहेल तिथे आला. जखमी सचिन याने सोहेलकडे खाण्यासाठी मावा मागितला. यावरून त्यांच्यात वाद झाला. यातून त्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोघांना वाद करू नका, असे फिर्यादी आनंदा समजावून सांगत असताना सोहेल याने बाजूला जाऊन तेथील चाकू घेऊन येत सचिन याच्या छातीवर व पाठीवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:57 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!