१७९ रक्तदात्यांनी केले रक्तदान !
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संजय ढवळे
धुळे : शहरात भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान सामुहिक सामायिक कार्यक्रम झाल्यानंतर भव्य वरघोडा (शोभायात्रा) रॅली शहरातून ढोल पथकाच्या गजरात काढण्यात आली. त्यात विविध चित्ररथांचाही समावेश होता. तर महिलांनी भगवान महावीर यांचे विविध संदेश असलेले फलक हाती घेतले होते. रॅलीत भगवान महावीर यांचा जय जय कार करीत अहिंसा परमो धर्मचा संदेश देण्यात आला. या शोभायात्रेने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील ग.नं. २ येथील जैन स्थानकापासून या शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली. त्यात महिलांसह पुरुष, तरूणांसह आबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत सजविलेल्या बैलगाडीच्या रथात भगवान महावीर यांची आकर्षक मुर्ती होती. ढोल पथकाच्या गजरात शोभायात्रा आग्रा रोडमार्गे फुलवाला चौक, गांधी पुतळा, जुने धुळे परिसर, सुभाष पुतळा, ग.नं.६, भावे शाळा, ग.नं.५, पारोळा रोड, खोल गल्ली, भांडी बाजार, जे.बी.रोड मार्गे आग्ररोड, शितलनाथ मंदिर जवळ समारोप करण्यात आला. यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सकल जैन श्रीसंघ व नवकार मंडल संघटनद्वारा श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सत्य आणि अहिंसाचा मार्गाचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. या महोत्सवासाठी भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवकार मंडळ संघटनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुनील मुथा, अध्यक्ष दिनेश सूर्या, कार्याध्यक्ष वरुण पाटणी, ऍड. राजेश मुनोत, प्रमोद जैन, सुरजमल सूर्या, राजेंद्र बाफना, दिलीप पारख, किशोर शहा, भरत जैन, संतोष पाटणी, विनोद भन्साळी, विखील शामसुखा, हरीश शहा, नानकराम तनेजा, कमलेश गांधी, विजय दुगड, विजय कांकरिया, रविंद्र पाटणी, चारुल सुराणा, तुषार बाफना यांचेसह समाज बांधवांनी प्रयत्न केले.
चौकट…
भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव निमित्त गेल्या २५ वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिर होत असून या वर्षी श्री वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. दरम्यान महिला, पुरुषांसह युवकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. एकूण १७९ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. प्रसंगी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे, पो.नि.निवृत्ती पवार, जीतूबापू चौवटिया आदी मान्यवरांनी उपस्थिती दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी युवक मंडळाचे अध्यक्ष तुषार बाफना, योगेश सांगवी, अनिल कांकरिया, अतुल बाफना, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अनिल बाफना, सचिन छाजेड, कीर्ती ताथेड, सुयोग खिवसरा, मयूर छाजेड, नरेंद्र नहार, किशोर संकलेचा, महावीर बागरेचा, उज्वल दुगड, ललित बरडीया, धिरज बाफना यांनी प्रयत्न केले.



