DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मुर्तिजापूर:- जयंती महोत्सव समिती २०२५ भगोरा व कलाविष्कार कला क्रीडा व बहु. शिक्षण संस्था भगोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भगोरा येथे १० एप्रिल ला दुपारी १ वाजता परिवर्तनाची काव्य फुले ही बहारदार काव्य मैफिल घेण्यात आली या काव्य मैफिल मध्ये निमंत्रित कवी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र जवादे, वऱ्हाडी कवी राजेंद्र भटकर, कवी पत्रकार अनिल डाहेलकर, गझलकार पत्रकार मिलिंद इंगळे, आंबेडकरी कवी ओंकार खंडारे, कवी पुनाजी खंडारे, कवी गजानन चव्हाण, चंद्रमणी वानखेडे उपस्थित होते.
सर्व प्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
चक्रवर्ती सम्राट अशोक राजा, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भगोरा येथे सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये एक सत्र “परिवर्तनाची काव्य फुले” ही काव्य मैफिल घेण्यात आली. यावेळी राजेंद्र भटकर यांनी सेल्फी व बोराटी ही वऱ्हाडी कविता सादर केली, रवींद्र जवादे सर यांनी सुमधुर आवाजात भीमगीत आणि गझल सादर केली, मिलिंद इंगळे यांनी भीमगीत रमाई व वऱ्हाडी गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, अनिल डाहेलकर यांनी प्रेमावरच्या कविता सादर केल्या,गजानन चव्हाण यांनी आईवर कविता सादर केली.
पुनाजी खंडारे यांनी कॉलेज जीवनातली कविता सादर केली.सुदर्शन सिरसाठ यांनी शेरोशायरीचा नजराणा पेश केला, सौ.छाया गोपनारायण यांनी गीत गायले.
अशा एक से बढकर कवितांच्या वर्षावाने गावकरी रसिकांनी भरभरून आस्वाद घेतला.
अनिल डाहेलकर यांनी पुरस्कारात हॅट्रीक मिळवल्या बद्दल आणि वाढदिवस निमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
बालकांना सुध्दा सामाजिक प्रश्न विचारून त्यांना विविध बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन गझलकार मिलिंद इंगळे यांनी केले आणि आभार सरपंच सुधीर खंडारे यांनी मानले .
यावेळी उपस्थित गावकरी
सुदर्शन सिरसाठ, संघपाल खंडारे, बाबाराव खंडारे, मुकेश खंडारे, सुरेंद्र खंडारे, सुधाकर शिराळे, मनोज नाईक, प्रमिला नाईक, रत्नकलाबाई खंडारे, मिलिंद खंडारे, जानराव खंडारे, जितेंद्र खंडारे, विलास खंडारे, नागेश ढिसाळे, दादाराव खंडारे, रवींद्र खंडारे, सौ.राजकन्या वानखडे, सौ.पुष्पा खंडारे, सौ.छाया गोपनारायण, सुषमा खंडारे, सौ.मंदा खंडारे, संगिता खंडारे, सुमन ढिसाळे, सौ.सपना खंडारे, सौ.सिमा खंडारे,सौ.कोमल खंडारे,शाम अटाटे, तसेच असं बाल व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी समाजसेवक पुनाजी खंडारे व सुधीर खंडारे यांनी परिश्रम घेतले.



