नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुख्यात ट्रॅक्टर चोर अटकेत;स्थानिक गुन्हे शाखा,धुळे व निजामपुर पोलीसांची संयुक्त कामगिरी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री :- निजामपुर ता.साक्री जि.धुळे पोलीस स्टेशन हद्दीतील खुडाणे गावाचे शिवारात दिनांक २४/०३/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास खुडाणे ते जैताणे रोडवर फिर्यादीचे शेतातील शेडमधुन ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) चोरीस गेले त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ००७५/२०२५ बीएनएस कलम ३०२(२) प्रमाणे दि.२५/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व निजामपुर पोलीसांनी केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे १) सुरेश ऊर्फ सु-या रमेश गावीत वय-३४ वर्षे रा. सावरत पो.कोळदा ता. नवापुर जि.नंदुरबार २) प्रभु होळ्या गावीत वय-३१ वर्षे रा.उचीशेवडी ता. नवापुर जि. नंदुरबार यांना स्थागुशा धुळे यांनी ताब्यात घेवुन त्यांना निजामपुर पोलीस स्टेशनने अटक केली होती. त्यांचेकडे पोलीस कोठडीत केलेल्या कसुन चौकशीत त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले ट्रॉलीसह,एक निळ्या रंगाचे सोनालिका DI-६० RX MM-७४४ कंपनीचे ट्रॅक्टर विना नंबर असलेले असा एकुण -९५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुन त्यास मा.न्यायालयाने सुरुवातीस चार दिवसाची व दिनांक १५/०४/२०२५ रोजी पासुन दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन ते पोलीस कोठडी रिमांडमधे आहे तसेच इतर आरोपीतांचा व गुन्ह्यातील इतर मुद्देमालांचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, पोउपनि/श्री अमित माळी (स्थागुशा धुळे), पोउनि/प्रदिप सोनवणे, पोउनि/मधुकर सोमासे, पोसई यशवंत भामरे, पोसई/चंद्रकांत गायकवाड, असई/संजय पाटील (स्थागुशा धुळे), पोहेकों/संतोष हिरे (स्थागुशा धुळे), पोहेकों/ सदैसिंग चव्हाण (स्थागुशा धुळे), पोहेकॉ/तुषार सुर्यवंशी (स्थागुशा धुळे), पोहेकॉ देवेंद्र ठाकुर (स्थागुशा घुळे), पोहेकों/रतन मोरे, पोकों/राकेश महाले, पोकों/दिपक महाले, पोकों/सुनिल पाटील (स्थागुशा धुळे), पोकों/सागर कांगणे, पोकों/सुनिल अहिरे पोकों/कृष्णा मिल, पोकों/पृथ्वीराज शिंदे, पोकों/गौतम अहिरे यांचे पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!