नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

उसामध्ये लावलेला 21 किलो 957 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🗞️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे


कोल्हापूर:- पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवैध अंमली पदार्थ साठा, विक्री व शेती करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.

पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार बाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार समीर कांबळे यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील माद्याळ या गावाचे कोंडार याठिकाणी असलेल्या उसाचे शेतामध्ये एका इसमाने गांजाची काही झाडे लावल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक यांचेसह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून दि. 15.04.2025 रोजी छापा टाकुन इसम नामे दिनकर कृष्णा राणे वय 75 धंदा शेती रा. माद्याळ ता. कागल, जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेवुन त्याचे मालकीचे उसाचे शेताचे मधोमध काही गांजाची झाडे मिळून आल्याने सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून शेतातील एकुण 21 किलो 957 ग्रॅम वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण 2,20,570/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेती मालक नामे दिनकर कृष्णा राणे यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द मुरगुड पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि चेतन मसुटगे, पोसई जालिंदर जाधव, तसेच पोलीस अंमलदार अशोक पोवार, समीर कांबळे, राजु कांबळे, अरविंद पाटील, विजय इंगळे, रोहीत मर्दाने, अनिकेत मोरे, युवराज पाटील, प्रशांत कांबळे, सतिश जंगम, हंबीर अतिग्रे, खंडु कोळी, प्रकाश पाटील, वसंत पिंगळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, विशाल खराडे, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, नवनाथ कदम, सोमराज पाटील, निवृत्ती माळी यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!