नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ग्रामदैवत येडमाय मातेच्या यात्रेला शुक्रवारी रोजी पासून सुरुवात.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: दि.१८ (चैत्र कृ ४) शुक्रवारी रोजी शेवाळी(दा.) ता.साक्री येथील ग्रामदैवत येडबाई मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत व ग्रामसुधार मंडळाच्या वतीने भाविकांना व व्यावसायिकांना सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
शेवाळी(दां) गावाची ग्रामदेवता येड माय मातेच्या यात्रेची परंपरा कित्येक वर्षापासून सुरू आहे हे गाव आधी पांझरा- कान नदी काठी जून्या मारुती मंदिराजवळ वसलेले होते. पांझरा-कान नदीकाठी एका बाजूला उत्तरेला शेवाळी तर दुसऱ्या बाजूला दक्षिणेला दातर्ती गाव वसलेले होते. १८व्या शतकात प्लेगची साथ सुरु झाली नदीकाठी उंदरांचे प्रमाण लक्षात घेवून प्लेग या रोगापासून बचावासाठी शेवाळी गाव नदी काठावरून रस्त्याकाठी स्थलांतरित झाले (आजच्या घडीच्या ठिकाणीं)म्हणुन या गावाला सडक शेवाळी अशा नावानेही ओळखण्यात येते.
जेव्हापासून हे गाव रस्त्याकाठी वसले तेव्हा पासून(कोरोना काळ वगळता) गावाची ग्रामदेवता येड माय मातेच्या कृपेने यात्रेची परंपरा खंडित न ठेवता अखंडीतपणे सुरु आहे.
यात्रेत गावातील नागरिकांसह बाहेर गावी असलेले हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेतील काही दुकानदार एक दोन दिवस अगोदर आपली दुकाने लावण्यास सुरुवात करतात. या यात्रेत विविध खेळण्यांची दुकाने, हॉटेल, आकाश पाळणे, आदी दुकाने मोठया प्रमाणात दरवर्षी दिसून येतात. यात्रा हि दीड दिवसांची असते. या यात्रेत आदिवासी समाजातील भाविक मोठया संख्येने उपस्थित असतात.ग्रामदैवत येड माय मातेची पुजा यात्रेच्या दिवशी सकाळीं ठीक ८वाजता असते तर संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास लांगड ची मिरवणूक (साळुंके घराणे) जि.प. मराठी शाळेपासून सुरुवात करतात व वेड माय मातेच्या मंदिराला पाच फेऱ्या मारून मराठी शाळेच्या आवारात त्याचे समारोप केले जाते.
गावातील व तसेच तालुक्यातील तमाशाची आवड असणाऱ्या तमाशा शौकिनांसाठी या वर्षी ग्राम सुधार मंडळाच्या वतीने रविभाऊ धुळेकर यांचा आदर्श लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. येड माय मातेच्या यात्रेला गावातील सर्व जाती धर्माचे लोक हजेरी लावून यात्रेचा आनंद घेतात.यात्रा व इतर कार्यक्रमांमध्ये कोणतीही बाधा येवू नये व यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ही ग्रामपंचायत व ग्राम सुधार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!