नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त : डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

मिरज : मिरजेत गांधी चौक पोलिसांनी वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून वाळू व डंपर असा आठ लाखांचा ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी डंपरचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गांधी चौक पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रूपाली गायकवाड व पोलिस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना दि. १३ रोजी रात्री मिरजेत सांगली रस्त्यावर हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर डंपरमधून बेकायदा, विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली. पोलिसांनामिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर झोपडपट्टीजवळ वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक डंपर पकडला. पोलिसांनी डम्परचालकास ताब्यात घेऊन बेकायदा उत्खनन केलेली चार ब्रास वाळू व वाळूच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेला डंपर असा एकूण ८ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

डम्पर चालकाकडे तपास केला असता, चोरटी वाळू वाहतूकीतील वाहनाचा मालक प्रवीण देसाई, रा. जयसिंगपूर याच्या सांगण्यावरून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस उपनिरीक्षक रूपाली गायकवाड यांपुढील तपास करीत आहेत. बेकायदा वाळू उपसा व अवैध वाहतुकचे प्रमाण वाढलेले असून यावरती प्रशासनाने योग्य असा तोडगा काढण्याची गरज आहे. यामुळे वाळूमाफीयांना आळा बसेल.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:01 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!