DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- निवास गागडे
इचलकरंजी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कन्नड आणि सांस्कृतिक विभाग बैंगलोर व रंग दर्शन ग्रामीण कला संघ (री) यांच्यावतीने संयुक्तीक कार्यक्रम धुळकनवाडी तालुका चिकोडी येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक व सांस्कृतिक कला मध्ये काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
चिक्कोडी जिल्हा सामाजिक कार्यकर्ता व कर्नाटक दलित संघर्ष समिती चिकोडी जिल्हाध्यक्ष सुभाष सनदी यांचे सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना धम्मचक्र भीम रत्न समाज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी धुळकनवाडी गावचे ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण मदर. ग्रामपंचायत सदस्य वैशाली कमते. प्राध्यापक मल्लिकार्जुन नडगिरी व कला आणि संस्कृती संघाचे कलाकार कार्यक्रमाचे आयोजक मारुती कामगौडा व भरत कलाचंद्र आणि समाजाचे बंधू आणि भगिनीसह ग्रामस्थ उपस्थित होते.



