(एकाच महिन्यात दोन पुरस्कार )
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
मुर्तिजापूर मधील हरहुन्नरी कलाकार मिलिंद इंगळे जे गझलकार पत्रकार चित्रकार गीतकार निवेदक अशा विविध क्षेत्रात समाजामध्ये आपले नाव रोवून आहेत. त्यांना ह्या मागील महिन्यात नागपूर येथे जन ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात नागपूर येथील आमदार भवनमध्ये त्यांच्या लिखाणाबद्दल जण ग्रामीण पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी साप्ताहिक दर्शन पोलिस टाईम्सचे मुख्य संपादक युवराज देवरे, पोलिस राऊंड मुख्य संपादक शैलेंद्र साळे,परिवहन चे मुख्य संपादक देवानंद अहिरे आणि जन ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच स्टार्ट अप शिक्षा इंडिया फाउंडेशन, डिजिटल इंडिया,स्कील इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२४- २५ चा कला , साहित्य पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्राबद्दल डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिलिंद इंगळे यांना दिल्ली येथून घरपोच प्रदान करण्यात आला.
विविध संस्था व संघटने मार्फत त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान करण्यात येत आहे.
यावेळी नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष , पत्रकार युवाश्री अनिल डाहेलकर,सृजन साहित्य संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यीक रवींद्र जवादे, गझलदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ गझलकार संदीप वाकोडे, कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळचे समस्त पदाधिकारी तसेच कलासृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन, जन ग्रामीण पत्रकार संघ अकोला व महाराष्ट्र, तरुणाई फाउंडेशन कुटासा,

ग्राम पंचायत भगोरा अशा विविध संस्था व संघटने मार्फत कौतुक करण्यात येत आहे.



