DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- सुनील मैदिले
भिवापूर :- भिवापूर तालुका पत्रकार संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच राजीनामा दिल्यानंतर, संघाच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यासाठी रविवारी (दि.२०) सकाळी शासकीय विश्रामगृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सूचनेनुसार पार पडली.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून एकमताने संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तिचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
अध्यक्ष शरद अ. मिरे, सचिव अमर मोकाशी, कार्याध्यक्ष समीर भा. पडोळे
कोषाध्यक्ष जोगेंद्र सरदारे, जिल्हा प्रतिनिधी राम वाघमारे, सदस्य सदाशिव नान्हे, जितेंद्र धोटे, नारायण चौधरी
संघामार्फत पत्रकारितेत नव्याने पदार्पण करणाऱ्या पत्रकार बांधवांनाही सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासाठी इच्छुकांनी संघाकडे अधिकृत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. या नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकार संघाच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



