DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🗞️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- निवास गागडे
इचलकरंजी:- लालनगरमधील मुबारकर शेख यांच्या राहत्या घरासमोरील त्यांच्या पत्र्याच्या ऑफिस मधील काऊंन्टरातील 20,000 हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 18,101 रुपये किमतीचे 2 ग्रॅम 220 मिली वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स असे एकूण 38,101 रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले असल्याची फिर्याद मुबारक मोहम्मद शेख राहणार लालनगर यांनी दिली. याबाबत फिर्यादी यांचे जबाबा नुसार संशयित आरोपी अनिल लोंढे वय वर्ष 16 राहणार लालनगर यांच्या विरोधात इचलकरंजी पोलीस ठाणे येथे 134/2025 बी एन एस कलम 305 प्रमाणे सहाय्यक पोलीस फौजदार सि.एम. ननावरे यांनी गुन्हा नोंद केला आहे.अधिक तपास कांबळे करीत आहेत.



