नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राष्ट्रीय सेवा पुरस्काराने संदीप देशमुख सन्मानित

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🗞️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

अकोला:- स्थानिक अकोला येथील तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शुभम साहित्य मंडळाचे सचिव साप्ताहिक वऱ्हाड नामा चे संपादक समाजसेवक पत्रकार श्री संदीप देशमुख यांना नुकताच वेल फाउंडेशन संचालित भारत सेवा सोसायटीच्या दिल्ली च्या वतीने नुकताच साहित्य व सामाजिक क्षेत्रासाठी राष्ट्रीय सेवा पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले असून सन्मानचिन्ह सन्मानपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तरुणाई फाउंडेशन कुटासाच्या माध्यमातून सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संदीप देशमुख अकोला जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात सुप्रसिद्ध साहित्य सेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत तरुणाई फाउंडेशन च्या माध्यमातून अकोला जिल्हास्तरीय साहित्य संमेलने तसेच राज्यस्तरीय साहित्य संमेलने घेऊन नवोदित तथा ज्येष्ठ साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. मागील तेरा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक व युवतीना सुद्धा स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित केले आहे. संदीप देशमुख यांना आतापर्यंत विविध संघटनेच्या तसेच संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार मिळालेले असून त्यांचा हा विसावा पुरस्कार आहे. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!