नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

माजी खासदार तडस यांना मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीवर कारवाई करण्याची मागणी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

अकोला :- वर्धा मतदार संघाचे माजी खासदार रामदासजी तडस यांना राम मंदिरात प्रवेश नाकारून असंविधानिक भाषेचा वापर केल्याबद्दल मंदिराचे ट्रस्टी याच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दि.२४/४/२०२५ मंगळवार रोजी मुर्तिजापुर येथील समस्त सर्व शाखीय तेली समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार शिल्पा बोबडे यांना दिले.
सविस्तर माहिती असे की देवळी, जिल्हा वर्धा येथील माजी खासदार रामदासजी तडस हे सकाळी १०:३० वाजता येथील राम मंदिरात पूजा करण्यासाठी गेले त्यावेळी मात्र मंदिराचे ट्रस्ट मुकुंद चौरीकर यांनी तुम्ही जानवे व सोवळे घातले नाही. त्यामुळे तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊ शकत नाही. असे बोलून त्यांना मनाई करून त्यांना अपमान जनक वागणूक दिली. याच्या निषेधार्थ व संबंधित मंदिराच्या ट्रस्टीवर कारवाई करण्यासाठी मुर्तीजापुर तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कळविण्यासाठी मुर्तिजापुर येथील सर्व शाखीय तेली समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन रामाभाऊ हजारे, संजय गुप्ता, स्वप्निल बनारसे, विशाल शिरभाते, योगेश आगाशे, दिपक बनारसे, सुमित सोनोने, प्रविण ढगे, निलेश सुखसोहळे, अक्षय बुराने गजानन गुल्हाने, स्वप्निल बुराने अशाप्रकारे बहुसंख्य तेली समाज बांधव उपस्थित होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:40 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!