नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भंडारा आरटीओचा ‘ओव्हरएक्शन’ भिवापूरात महागात पडला!

⭐ संतप्त वाहन मालक व नागरिकांनी धरले धारेवर

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी

भिवापूर :- भंडाऱ्यातील आरटीओ अधिकारी सुभाष ठोंबरे यांनी चक्क नागपूर जिल्ह्यात जाऊन वाळू भरलेल्या ट्रकवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची ‘ओव्हरएक्शन’ थेट लोकांसमोरच फसली! स्थानिक नागरिकांनी कार्यक्षेत्राची आठवण करून देत, त्यांच्या कारवाईवरच प्रश्न उपस्थित करत त्यांना धारेवर धरले.
घटना घडली पवनी तालुक्यातील नीलज फाट्याजवळ. बुधवारी (दि. 23) रात्री 9 च्या सुमारास ठोंबरे आणि त्यांचे सहकारी पेट्रोलिंगवर असताना, एक वाळू भरलेला ट्रक नागपूरच्या दिशेने जाताना दिसला. ट्रक थांबवण्याचा इशारा देण्यात आला, पण ट्रक चालकाने थेट स्पीड वाढवत धूम ठोकली.
यामुळे ठोंबरे यांचा पारा चढला आणि त्यांनी आपल्या सरकारी गाडीने (MH 04 LT 6736) थेट पाठलाग सुरू केला. पाठलाग करत-करत हे अधिकारी पोहोचले भिवापूर (जि. नागपूर) येथील अलंकार सिनेमाजवळ. तिथे त्यांनी ट्रकसमोर गाडी आडवी लावून त्याला थांबवलं.
पण खरी गोष्ट तर तिथूनच सुरू झाली!
आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी पाहिलं की आरटीओ अधिकारी चक्क दुसऱ्या जिल्ह्यात ट्रक अडवत आहे. ट्रकचालक आणि मालकाने आरटीओला थेट विचारलं, “साहेब, इथे अधिकार कुठून मिळाले?” आणि मग सुरू झाला प्रश्नांचा भडीमार!
नागरिकही मागे हटले नाहीत – “तुमच्या भंडाऱ्यातून शेकडो ट्रक दररोज वाळू घेऊन बाहेर पडतात, त्यांना सोडून इथे कशाला आलात?”
आरटीओ ठोंबरे यांच्याकडे या सगळ्याची उत्तरं नव्हती. परिस्थिती चिघळू लागली, आवाज चढले, गर्दी वाढली – आणि मग शेवटी भिवापूर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी वातावरण शांत करत ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं.
सध्या ही घटना येथे चांगलीच गाजतेय. नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत केलेल्या या ‘बाहेरख्याली’ कारवाईमुळे भंडारा आरटीओचं नाव चर्चेत आलं आहे – तेही फारसं गौरवास्पद कारण नसतानाच!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!