नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अपघातासाठी महसूल विभागाचे वाहन जबाबदार नाही – तहसीलदार डहाट यांचे स्पष्टीकरण

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी

भिवापूर :- गोंडबोरी फाट्याजवळ शनिवारी (दि.26) झालेल्या भीषण अपघातास महसूल विभागाचे वाहन कारणीभूत नसल्याचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी स्पष्ट केले. आज तहसील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
साठगाव येथील तिघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यात एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे. उमरेडकडे भरधाव जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर गावकऱ्यांनी महसूल विभागाच्या वाहनाने वाळूच्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग केल्यामुळे टिप्पर चालकांनी वाहने भरधाव पळविली, व त्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप केला होता.
या आरोपांचे खंडन करत तहसीलदार डहाट यांनी सांगितले की, “गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत फिरते पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वाहनांची तपासणी करत असते, मात्र अपघाताच्या दिवशी पथकाचे वाहन गोंडबोरी फाटा या अपघातस्थळी गेलेच नाही.”
त्यामुळे या दुर्घटनेस महसूल विभागाचे वाहन जबाबदार असल्याचे सांगणे चुकीचे असून, सत्य परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!