नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अहिल्यानगर – मनमाड रोडवर प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत टोळीच्या राहुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

⭐अटकेदरम्यान चोरलेले दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, आधार कार्ड तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 73450/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

⭐दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी फरार, आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता••

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- दिनेश गायकवाड


अहिल्यानगर:- दिनांक 24/04/2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं – 473/2025 बी एन एस कलम 309(4) प्रमाणे फिर्यादी रमेश रघुनाथ धीवर रा.राहता, यांना दि. 21/04/2025 रोजी रात्री 11 वाजे सुमारास नगर मनमाड रोडवर अडवून त्यांच्याकडून मोबाईल, पैसे व इतर साहित्य बळजबरी हिसकावून नेले बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी 1) नागेश संजय चव्हाण वय-23 रा. मोमीन आखाडा, 2) योगेश सोपान बाचकर वय-29 रा.बारागाव नांदूर यांनी सदर गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मा.पोनि/संजय ठेंगे यांना मिळाल्याने, सदर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना दिनांक 25/04/2025 रोजी अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. रिमांड कालावधीमध्ये आरोपींकडून त्यांनी चोरलेले दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, आधार कार्ड व इतर साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असे एकूण 73450/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्यांचा तिसरा साथीदार गणेश अरुण शिनारे रा. मोमीन आखाडा हा फरार असून राहुरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई मा. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय आर. ठेंगे यांचे नेतृत्वाखाली, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोहेकॉ /संदीप ठाणगे, विजय नवले, पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, जयदीप बडे, अंकुश भोसले, योगेश आव्हाड नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनर यांनी केलेली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:00 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!