नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

म्हसवड पोलिसांचा वाळू माफियांना दणका, तब्बल 25 लाख 18 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर धडक कारवाई..

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- रविंद्र पवार

सातारा:- म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीच्या पात्रातून एक पिवळ्या रंगाच्या डंपर ट्रकमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर डंपरला पकडण्यासाठी जाऊन त्याचा म्हसवड, शिरताव व पुळकोटी तसेच आजूबाजूचे गावांमध्ये शोध घेतला असता म्हसवड बाजू कडून बनगरवाडी ते मेगा सिटी जाणारे रोडवर बनगरवाडी गावचे पुलाजवळ पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली दिसून आली. त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी नामे 1) सोमनाथ आप्पा तोरणे वय 32 वर्ष राहणार कुकुडवाड तालुका माण, जिल्हा सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डंपर, वाळू असा 25 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, जगन्नाथ लुबाळ, राहुल थोरात, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, होमगार्ड अजित शेळके अक्षय गायकवाड, पोलीस मित्र सुमित बोडरे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!