नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्वागत, सत्कार आणि नियुक्ती सन्मान पुरस्कारांचा डाहेलकर यांचा षटकार …

युवकांनी अनिल डाहेलकर यांचा आदर्श जोपासत समाज कार्य करावे : आदर्श माजी सरपंच मा. पुनाजी खंडारे

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

अकोला : येथिल साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल डाहेलकर यांना या दोन महिन्यात चार पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले. तर त्या नंतर अनेक ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल स्वागत सत्कार करण्यात आला.

विविध स़ंस्था, संघटना, मंडळांच्या कार्यक्रम आयोजनाचा सदैव हिरिरीने सहभागी होणारे डाहेलकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व असुन त्यांच्या कडून युवकांनी प्रेरणा घेवून कार्य करावे असे उदगार आदर्श माजी सरपंच पुनाजी खंडारे भगोरा यांनी आई बाबा बहुउद्देशिय संस् द्वारे अनिल डाहेलकर यांच्या सत्कार प्रसंगी काढले.

लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी डाहेलकर यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय देशमुख निम्बेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांना नियुक्ती आणि ओळख पत्र वऱ्हाडी साहित्यिक पुष्पराज गावंडे आणि ईतर मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले.

डाहेलकरांना घवघवीत यश प्रदान करणाऱ्या या दोन महिन्यात भारत रत्न डॉ. आंबेडकर राष्ट्रीय दोन पुरस्कार आणि पद्मश्री मणीभाई देसाई राष्ट्र सेवा राष्ट्रीय पुरस्कारांची अशी हॅट्रिक साधत चार पुरस्कार मिळाले आहेत. तर वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती पर्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदर्श समाज सेवक पुरस्कार व महाराष्ट्र ग्रामिण न्युज मलकापुर चा महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2025 असे दोन जाहिर झाले आहे असून अनिल यांनी पुरस्कारांचा षटकार ही त्यांनी हाणला आहे.

आकाश उर्फ अनिल डाहेलकर यांच्या चौफेर यशा बद्दल सृजन साहित्य संघाचे संचालक ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र जवादे, गझलदीप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार संदीप वाकोडे, कलाविष्कार साहित्य कला व क्रिडा बहूउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार मिलिंद इंगळे, अंकुर साहित्य संघांचे माजी तालुकाध्यक्ष ऋषिकेश बोबडे, शेतकरी संघटनेचे अरविंद तायडे, समाधान इंगळे,कल्पक कांबळे, आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!