नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ?दारुबंदीचा पुन्हा असलोद ग्रामसभेत ठराव

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- रविंद्र गवळे

नंदुरबार : शहादा तालुक्यातील असलोद येथे नुकतीच काही महीन्या पुर्वी प्रशासनाच्या जिल्हाधिकारी मिताली शेटी याच्या आदेशाने दारुबंदीची निवडणुक झाली त्यात महीलाचा विजय झाला व कायस्वरुपी असलोद गावात दारुबंदी केली जिल्हाधिकारी कार्यालयातुन असलोद ग्रामपचायतीला परवाने रद्द व दारुबदी आदेशाची प्रत देखील पाठवली त्या आदेशाची उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग, प्रशासन विभाग व जनतेच्या माहीतीसाठी गावकऱ्यानी व ग्रामपचायतीने पोलीस्टेशनच्या गेटसमोर ठळक अक्षरात मोठे बोर्ड लावले तरी देखील असलोद गावात सरास व राजरोस पणे अवैध दारु विक्री सुरुच होती तरी देखील उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभाग व प्रशास लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे असलोद गावात प्रशासनाने दारुबंदी साठी कुठलीच कार्यवाही केली नाही का? उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभाग हफ्ते घेतात का? अवैध धदे वाल्याचे उत्पादन शुल्क व पोलीस विभाग याच्याशि काय गुप्त गु काहीतरी ठरलय का ? असे अनेक प्रश्नचिन्ह प्रशासनाच्या कामकाजा बद्दल, उत्पादन शुल्क व पोलीसाच्या कामकाजावर असलोद गावासह परिसरात होवु लागल्याने महीला वर्ग सताप व्येक्त करु लागल्या होत्या त्यामुळे गेल्या दोन तारखेच्या ग्रामसभेतच पोलीसाच्या, प्रशानाच्या, उत्पादन शुल्क व पोलीसाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होवु लागले व ग्रामसभेत आलेला अर्ज ग्रामसेवकाने वाचुन दाखवला त्यात स्थानीक उत्पादन शुल्क व असलोद पोलीसाचे तात्काळ निलंबन किवा बदली करण्यात यावी व त्याच्या जागी सक्षम अधिकारी असलोद ओपीला पोलीस प्रशासनाने द्यावा अशी मागणी केली होती त्यावर चर्चा करुन बहुमताने दारुबंदीचा पुन्हा ठराव करण्यात आला व तो खालच्या प्रशासनापासुन ते मंत्रालया पर्यत देण्याचे ठरले या दारुबंदीच्या ठरावामुळे पुन्हा जो पर्यत दारुचा असलोद गावासह परिसरातुन हद्दपार उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन करित नाही तो पर्यत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यानी व ग्रामपचायतीने गा्मसभेत केला.या निर्णयामुळे अवैध धदे करणारे व असलोद गावातील महीला,ग्रामपचायत याच्यात वैर होण्याची चिन्हे दिसु लागले आहेत आता उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने वेळीच अवैधदारुविक्री करणाऱ्यान वर कठोर कार्यवाही करावी अन्यता असलोद गावात परिस्थीती हाताबाहेर गेल्यास कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थीती निर्माण व्हायला नको यासाठी शासनाने अवैध धदेवाल्यान विरोधात वेळीच कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा असलोद गावकरी व्येक्त करित आहे
गेल्या दोन तारखेच्या ग्रामसभेत पुन्हा दारुबंदी ठराव झाल्या नतंर असलोद उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभाग दारुबंदी बाबत किती कडक कार्यवाही करतात याकडे असलोद परिसरातील सर्व महीलाचे लंक्ष लागले आहे
*या परिसरात होत होती अवैध दारुविक्री*
असलोद पोलीस दुरक्षेत्राच्या अर्धा किलोमीटर लांब मंदाणे रस्त्यावर सरास हम करे सो कायदा या म्हणी प्रमाणे परवाने रद्द झाल्यावर देखील ढाब्यावर दारुविक्री होत होती तसेच असलोद पोलीस स्टेशनाच्या बाजुच्या गल्लीत देखील सरास अवैधदारु विक्री होत होती तसेच ही गल्ली पोलीस चौकीच्या काही अंतरावर असुन सुध्दा सकाळ संध्याकाळ मध्य शोकीनाची वर्दळ असायची ग्रामपचायतीच्या मागे देखील राजरोसपणे अवैध दारुविक्री होत होती, एवढेच नाही तर या अवैध दारुविक्री विक्री करणाऱ्यानी सप्तश्रृंगी मंदिर व नागेश्वर मंदिर हा परिसर सुध्दा सोडला नाही एवढ्या ठिकाणी खुलेआम दारुविक्री होत असल्याने असलोद गावात जनु काय अवैध धंदे करणाऱ्याचे असलोद गावात पु्न्हा राज सुरु झाले का असा प्रश्न असलोद गावातील सामान्य जनतेला पडत होते. प्रशासन कुठलीही कार्यवाही करीत नसल्याने सर्व महीला वर्गात नाराजीचे वातावरन निर्माण झाले होते त्यामुळे दोन मे च्या ग्रामसभेत पुन्हा दारुबंदीचा ठराव करण्यात आला आहे.
*अवैध दारुविक्री करणारे, उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासन याच्या कडुन जिल्हाधिकारीच्या दारुबंदीच्या आदेशाला केराची टोपली*
असलोद परिसरात सरास सर्वीकडे अवैध दारुविक्री होत असल्याने महीलानी दारुबंदी साठी निवडणुकीत जी मेहनत घेऊन बहुमताने दारुबंदीच्या बाजुने मतदान केले त्यात महीलाचा विजय झाला बोगस परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यानी दिले तरी देखील अवैध दारुविक्री गावात सुरुच होती हे लक्षात आल्यावर महीलान मधे सताप व्येक्त होत होता.
जिल्हाअधीकारी यांनी दारुबंदी च्या आदेशाची अवैध धदेवाले, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन पायमल्ली करत असल्याचेे गावकऱ्याना व महीलाना समजले त्यामुळे गावकऱ्यानी पुन्हा दारुबंदीचा ठराव करण्याचा निर्णय घेण्याची चर्चा सुरु झाली व तसा ठराव बहुमताने दोन मे च्या ग्रामसभेत महीला व गावकऱ्यान कडुन पारीत करण्यात आला आहे त्याच्या प्रती प्रशासनाला माहीतीसाठी देण्यात येणार आहे.
*पोलीसाच्या ग्रामसभेच्या दिवशी अवैध दारुविक्री करणाऱ्यावर धाडी*
गेल्या दोन तारखेला ग्रामसभेत पोलीसान समोरच गावकऱ्याचा संताप व्येक्त होत असल्याने उत्पादन शुल्क, पोलीसाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण केल्याने पोलीस प्रशासन झोपेतुन जागे झाले ग्रामसभा संपल्यावर लगेच काही तासातच युट्युबच्या चॅनल माध्यमातुन असलोद ग्रामसभेत झालेल्या दारुबंदी ठरावाच्या बातम्या प्रसारित झाल्या व पोलीस प्रशासनाने अवैधदारुविक्री करणाऱ्यान वर धाडसत्र टाकुंन गावातील चार ते पाच जनाना दारुसाठासह ताब्यात पोलीसानी घेतले व त्याच्यावर पोलीसानी कार्यवाही देखील केली.
*पोलीसाना असलोदगावात अवैध दारुविक्री करणारे रगेहाथ सापडल्याने गावात दारु विक्री होते हे गावकऱ्याचे आरोप सिध्द झाले*
असलोद गावातील महीला, गावकरी, ग्रामपचायत यांनी प्रशासनावर, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासनावर जे आरोप दोन मे च्या ग्रामसभेत केले ते आरोप सत्ये असल्याचे सिध्द झाले आहे. ग्रामसभेच्या दिवशीच पोलीसाच्या धाड सत्रात दारुसाठासह रगेहाथ अवैध दारुविक्री करणारे सापडल्याने असलोद गावातील महीलानी समाधान देखील व्येक्त केले परंतु असेच धाड सत्र पोलीसानी नेहमी असलोद गावात सुरुच ठेवावे व तिन वेळा दारु सापडल्यास अवैध दारुविक्री कराऱ्याला तडीपार पोलीसानी करावे अशी मागणी देखील परिसरातील महीला करित असल्याची चर्चा असलोदसह परिसरात होत आहे. पोलीसानी व उत्पादन शुल्क विभागाने ठोस कार्यवाही केली नाही तर पुन्हा येणाऱ्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्याचा निर्णय गावकरीन कडुन करण्यात येणार असल्याचे महीलान कडुन बोलले जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!