नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणात नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई.

5.39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण

नंदुरबार:- नंदुरबार शहरात अवैध विदेशी दारूच्या वाहतुकीवर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 लाख 39 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 5 मे रोजी शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कंजरवाडा रोडवरून एक इसम लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करत आहे. सदर माहितीची खात्री करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ कारवाईस रवाना झाले.

गौतम नगर परिसरात थांबलेल्या पोलीस पथकास काही वेळातच वर्णनानुसार लाल रंगाची टाटा कंपनीची चारचाकी (क्रमांक MH-41-V-0742) वाहन दिसून आली. पाठलाग करून गाडी यशवंत विद्यालय परिसरात अडवण्यात आली. वाहनात विजयसिंग रामसिंग नाईक (वय 50, रा. केरवा, खांडबारा) आणि पंकज प्रकाश चौधरी (वय 34, रा. संताजी चौक, खांडबारा) हे दोघे होते.

तपासणीदरम्यान गाडीतून विदेशी दारूचे बॉक्स सापडले. या दारूविषयी विचारणा केली असता त्यांनी कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पोलीसांनी एकूण 5.39 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 284/2025, महा. दारुबंदी कायदा कलम 65(अ), 65(ई), 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अमितकुमार मनेळ, सपोनि. रविंद्र बागुल, पोउपनि. स्वप्नील पाटील तसेच भटु धनगर, सुनील वाकडे, राहुल पांढारकर, भगवान मुंडे, हरेश कोळी, किरण मोरे, वाघमोडे आदींनी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:06 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!