नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पोलिस पाटीलला पोलिसांच्या नावाने लाच घेणे भोवले;पोलीस पाटील धुळे एसीबीच्या जाळ्यात.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: कौटुंबिक छळ प्रकरणात दाखल तक्रारीनंतर दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी पोलिसांच्या नावाने दहा हजारांची लाच मागून दोन हजारांची लाच स्वीकारतांना बळसाणे ता. साक्री जि. धुळे येथील पोलीस पाटलाला धुळे एसीबीने अटक केली आहे. आनंदा भटा पाटील (३६) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार हे बळसाने गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गावातील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेत त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून कोर्टात
दोषारोपपत्र दाखल करण्याकरिता पोलिसांना दहा हजार रुपये द्यावे लागतील असे १५ एप्रिल रोजी सांगितले व पोलिसांच्या नावाने लाच मागणी केल्याने धुळे एसीबीकडे तक्रार देण्यात आली.लाच पडताळणीत आरोपीने दहा हजारांची लाच मागणी करून आठ हजारात तडजोड करण्याचे मान्य केले व मंगळवार दि.६ मे रोजी रात्री उशिरा लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये स्वीकारतांना पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांना पकडण्यात आले. आरोपीविरोधात निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!