DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संजय दिंडे
कोल्हापूर:- राजारामपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथक पोलिसांनी १ किलो २१८ ग्रॅम गांजा व मुद्देमाल जप्त केला. संतोष रामसिंग गौतम हा पांढरे रंगाचे मोपेड वरुन डिकीमध्ये गांजा घेवुन विक्री करणे करीता राणी बाग येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी सापळा रचून छापा कारवाई करण्यात आली.
सदर छापा कारवाई मध्ये
संतोष रामसिंग गौतम, व.व.२८, रा. नवण्या माख्ती मंदिर मागे, शाहुनगर, कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात गांजा, मोपेड व मोबाईल हँडसेट असे साहित्य त्याचेकडे मिळुन आले गांजा बाबत चौकशी केली असता त्याने गांजा विक्री करीता आणला असलेचे समक्ष कबुली दिली संतोष रामसिंग गौतम वर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गु.र.नं. २८४/२०२५, NDPS कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये ३०,४५० रूपये किंमतीचा ०१ किलो २१८ ग्रॅम वजनाचा गांजा
२५,००० हजार रुपये किंमतीची अॅक्टीव्हा मोपेड ११,००० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हँडसेट असा एकुण ६६,४५० रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हयाचा अधिक पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे करीत आहेत.



