नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

म्हसवड पोलीस ठाण्याची अवैध धंद्यावर बेधडक कारवाई….

सपोनी अक्षय सोनवणे यांची स्टाफ सहित वाळू माफियांना दणका
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- बापूसाहेब कांबळे

सातारा :- अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीस पिकअप टेम्पो आणि वाळू सह ताब्यात घेऊन अटक, पाच लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..

सविस्तर हकीकत
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीच्या पात्रातून एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप टेम्पोमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर पिकअपला पकडण्यासाठी जाऊन त्याचा म्हसवड परिसरात शोध घेतला असता म्हसवड बाजू कडून म्हसवड ते माने वस्ती जाणारे रोडवर मल्हार नगर येथील समाज मंदिराशेजारी पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली. त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी नामे 1) कुलदीप संपत माने राहणार माने वस्ती म्हसवड तालुका माण, जिल्हा सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पिकअप टेम्पो, वाळू असा 5 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:13 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!