नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सामाजिक न्याय व आदिवासीचा निधि वळीवल्याच्या निषेधार्थ पँथर आर्मीचे प्रांतकार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे

इचलकरंजी:- सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 746 कोटी रुपयेचा निधि लाडकी बहीन योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयासमोर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले व राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसाद विनायकराव कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी 02/05/2025 रोजी काढलेल्या जी.आर. नुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा कडील 410 कोटी 30 लाख रुपये आणि आदिवासी विकास विभागाकडील 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीन योजने करिता वळीवण्यात आला आहे . या शासन निर्णयाचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

अर्थसंकल्पात अनु जाती व अनुसूचित जमातीचा निधी हा त्याच सर्वगातील विकासाठी खर्च करावा असा केंन्द्र सरकाच्या निति आयोगाकडील मार्गदर्शक सूचना असताना हे राज्य शासन पळवाटा शोधून अनु जाती व अनुसूचित जमाती यांचा निधीवर दरोडा टाकत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनु. जाती उपयोजना ( SCSP) करिता 22 हजार 658 कोटी तर अनुसुचित जमाती उपयोजना (TSP ) 21 हजार 495 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या पैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग साठी सहाय्यक अनुदान ( वेतनेतर ) तीन हजार 960 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या पैकी 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीन योजनेला वर्ग करण्यात आला. तसेच आदिवासी खात्याकडील तीन हजार 420 कोटी रुपये सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहीण योजने करिता वळवण्यात आला असे एकुन 746 कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागाला वर्ग केला गेला आहे
अनु जाती व अनुसूचित जमातीच्या विकासाचा निधि इतर खात्याकडे विळविणे म्हणजे अर्थिक नाकेबंदी करून त्यांना मुलभूत विकासापासुन वंचित ठेवणे असा होतो.
केंन्द्र सरकारच्या निति आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार अनु जाती व अनुसूचित जमाती यांना अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक असते. पण हे राज्य सरकार निति आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना तिलांजली देऊन त्याचे आर्थिक हक्क नाकारत आहे. या समाजाचा शैक्षणीक सामाजिक व आर्थिक विकास होऊ नये या जातीवादी मानसिकतेतून त्यांच्या हक्काचा निधि इतर खात्याकडे वळवून त्यांना विकास योजना पासुन वंचित ठेवत आहेत. आंदोलना दरम्यान आंदोलकाच्या शिष्टमंडळानी प्रांत कार्यालयातील शिरेस्तेदार नायब तहसीलदार संजय काटकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी काटकर यांनी आंदोलकाच्या भावना राज्य शासनाकडे कळवू असे अभिवचन दिले .
या आंदोलनात पँथर आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ॲड ममतेश आवळे, कोल्हापुर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव नितेश दिक्षांत, संतोष करात, बाळू कराळे, दिपक कांबळे, सुभाष कांबळे, नितिन घावट, अक्षय कदम समिर विजापुरे आदीच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!