DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी: निवास गागडे
इचलकरंजी: इचलकरंजी शहरातील महा ई सेवा केंद्रांच्या तपासण्या करूनच नव्याने केंद्रांना जाहीरनामा काढावा. आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावे असे अल्पसंख्याक मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तय्यब गडकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. माहीतीचा अधिकार कायदयाचे पालन करीत नसलेल्या सामान्य प्रशासन शाखा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील विजय पवार, नाळे, सह हातकणंगले पुरवठा कार्यालयातील सुरेखा पोळ यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन मागणी केले माहीती तात्काळ मिळावी याकरिता इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तय्यब गडकर यांनी कोल्हापूर जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
इचलकरंजी शहरातील महा ई सेवा केंद्राची तपासणी व इतर माहीती अप्पर तहसिल कार्यालय इचलकरंजी कार्यालयाकडे मागणी केली होती. इचलकरंजी अप्पर तहसीलदार यांनी महाईसेवा केंद्र तपासणी ही जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या कडून केले जाते. त्यामुळे मागणी केलेली माहिती ही जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांचे कार्यालयाकडून घेण्यात यावी असे लेखी दिले होते. तय्यब गडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे माहीती मागणी केली. जिल्हा अधिकारी कार्यालयातील जन माहीती अधिकारी यांनी महा ई सेवा केंद्र तपासणी बाबत दिशाभुल करणारे पत्रव्यवहार केला. गडकर यांनी तहसिलदार (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रथम अपिलीय दाखल केले प्रथम अपील अधिकारी यांनी माहीती तात्काळ व विनामुल्य देणेचा आदेश करण्यात आला. आदेशाचे अनुषंगाने जन माहिती अधिकारी राजन नाळे यांनी इचलकरंजी शहरातील ३३ पैकी २०२५ या चालु वर्षी फक्त ९ महा. ई. सेवा केंद्र तपासणी करण्यात आले असल्याचे दिले. उर्वरीत महा. ई. सेवा केंद्र मंडल अधिकारी यांनी केलेले नाहीत असे स्पष्ट झाले.
सन २०२२ मध्ये इचलकरंजी शहरातील मंडल अधिकारी यांनी १७ महा.ई. सेवा केंद्राची तपासणी केलेली असलेचे दिले होते. त्या १७ महा ई सेवा केंद्र मधील काही महा. ई. सेवा केंद्र बंद आहेत, तर काही सद्यठिकाणी चालु असलेचे दिसून येत नाहीत, आणि काही ठरवून दिलेल्या ठिकाणी नसलेचे तपासणी अहवाल इचलकरंजी मंडल अधिकारी महेश शिंदे यांनी दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने सन २०२२ साली इचलकरंजी शहरात २२ महा. ई. सेवा केंद्र असल्याचे लेखी दिले होते.त्यातील इचलकरंजी मंडल अधिकारी यांनी सन २०२२ साली १७ महा. ई. सेवा केंद्र तपासणी केलेले अहवाल शासनास सादर केले आहेत. २०२५ या चालु वर्षात ९ महा. ई. सेवा केंद्र तपासणी केले असल्याचे लेखी जिल्हाधिकारी कार्यालय देत आहे. यासर्व प्रकारामधून जिल्हाधिकारी कार्यालय सेतुचा कोणताही ताळमेळ दिसुन येत नाही, यातुन जिल्हाधिकारी कार्यालयाचा भोंगळ व दिशाहीन कारभार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
त्यातच इचलकरंजी मंडल अधिकारी महेश शिंदे यांचे जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांनी अपु-या महा. ई. सेवा केंद्राचे तपासणी करुन अहवाल सादर केले आहेत. मागणी केले माहीती, अधिकारात दिशाभुल करणारे पत्रव्यवहार व मंडल अधिकारी तपासणी अहवाल यातुन जिल्हाधिकारी यांचा भोंगळ कारभार उघड झालेला आहे.
माहीती अधिकार अंतर्गत मागणी केले २०१८ पासूनची माहीती दिली गेली नाही. २०२५ या वर्षात फक्त ९ महा. ई. सेवा केंद्राची तपासणी केलेली असल्याचे अहवाल दिलेले आहेत. त्यामध्ये सुध्दा मंडल अधिकारी यांनी काही जागेची (ठिकाण) बाबत तपासणी अहवालात नमुद केलेले नाही.असा अहवाल जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
कार्यालयातील अधिकारी यांच्याकडून अपुरी व चुकीची माहीती दिली जात आहे.
जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रथम संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्त लावावी.तसेच जिल्हा अधिकारी कोल्हापूर कार्यालयाने इचलकरंजी शहरातील सन २०१० पासून आजपर्यंत मंजूरी दिलेल्या महा. ई. सेवा केंद्राची आपले स्तरावरुन तपासणी पुर्ण होत नाही तो पर्यंत शहरातील महा. ई. सेवा बाबत नव्याने जाहीरनामा काढू नये. तसेच राजन नाळे, विजय पवार यांचेसह इचलकरंजी मंडल अधिकारी यांचेवर कार्यालयीन लागू नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.