DPT NEWS NETWORK
दर्शन पोलीस टाईम
प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गावाचे शिवारात दिनांक १७/०५/२०२५ रोजी पहाटे ०४.०० वाजेच्या सुमारास गेल अँन्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय.सी.आर.क्र.०१ व क्र.०२ ब्लॉक नं.०४ व ०८ व आय.सी.आर.क्र.१० मधील ब्लॉक नं.३५ व ३६ मधील कॉपर कॅबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०१३७/२०२५ बीएनएस कलम ३०५,३३१.३(५) प्रमाणे दि. १७/०५/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने प्रभारी अधिकारी सपोनी/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे १) बंडु भाऊसाहेब ऊर्फ भावसिंग मालचे रा. जयश्री सोसायटी पोस्ट भामेर ता. साक्री २) भिका शिवदास पवार रा.जैताणे निजामपुर ता. साक्री ३) गोकुळ गेंदा पवार, ४) जितेंद्र मांड्या मोरे, ५) भरत सुकदेव सोनवणे, ६) प्रतीक दयाराम मोरे सर्व रा.जयश्री सोसायटी पोस्टे भामेर ता.साक्री जि.धुळे यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल तसेच लोखंडी कटर असे एकुण १,०५,८७० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन ते पोलीस कोठडी रिमांडमधे आहेत.
सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा.किशोर काळे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, पोउनि/प्रदिप सोनवणे, पोउनि/मधुकर सोमासे, पोसई यशवंत भामरे, पोसई/चंद्रकांत गायकवाड, असई/रुपसिंग वळवी, पोहेकों/प्रशांत ठाकुर, पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकॉ प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/श्रीराम पदमर, पोकों/सागर कांगणे, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/टिलु पावरा, पोकों/कृष्णा मिल, पोकों/गौतम अहिरे यांचे पथकाने केली आहे.