नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अमरावती विभागातून प्रथम आली अनुष्काराजे खेडकर

(मॉ जिजाऊ वाचनालयातर्फे सन्मान)

शासनाने गुणवान विद्यार्थीनीला मदतीचा हात द्यावा : अ‍ॅड. इंगळे

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

अकोला: नुकताच १० वीचा रिझल्ट लागला त्यामध्ये माऊंट कार्र्मेलची गुणवान विद्यार्थीनी उच्चशिक्षीत विनाताई खेडकर व प्रा. डॉ. अ‍ॅड. एकनाथ खेडकर यांची सुकन्या कु. अनुष्काराजे खेडकर हीने १०० टक्के गुण संपादन करून अमरावती विभागामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला़. अनुष्काराजे हीने कोणतीही शिकवणी लावलेली नव्हती. तसेच सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सतत अभ्यास करून अनुष्काने यश संपादन केले आहे. अमरावती विभागात प्रथम येणार्‍या या गुणवान विद्यार्थीनीचा सत्कार मॉ जिजाऊ वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार पंजाबराव वर, सन्माननीय सचिव अ‍ॅड. प्रजानंद उपर्वट, वाचनालयाचे कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. एम.एस. इंगळे, ज्येष्ठ कलावंत प्रकाश जंजाळ सर, समाजसेवी व्यक्तीमत्व बाळाभाऊ दाभाडे, अर्नवराजे खेडकर, संचीत इंगळे, आदित्य इंगळे, यांच्या वतीने कु.अनुष्काराजे हिला पुष्पहार, पुष्पगुच्छ, पेन देऊन सर्वांना पेढे भरवून सत्कार करण्यात आला. अनुष्काराजे खेडकर हीने आपल्या यशाचे श्रेय आपले वडील प्रा.डॉ.अ‍ॅड. एकनाथ खेडकर, आई विनाताई खेडकर तसेच गुरुजनांना दिले.
जिल्हा व सत्र न्यायायालयातील प्रसिद्ध वकील एम.एस. इंगळे
म्हणाले की, कु. अनुष्काराजे खेडकर या विद्यार्थीनीने महाराष्ट्रामध्ये अकोल्याचा बहुमान वाढवून लौकीक प्राप्त केला आहे, अशा गुणवान रमाई-जिजाऊ-सावित्रीच्या लेकीचा शासनाने विशेष सत्कार करून तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत घोषित करावी, तसेच जिल्हाधिकारी यांनी तिचे घरी जाऊन यथोचित सत्कार करावा असा मनोदय व्यक्त केला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:01 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!