नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सहा हजाराची लाच मागितले प्रकरणी वनपाल अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरची कारवाई.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- संजय दिंडे

कोल्हापूर:- सहा हजाराची लाच मागितले प्रकरणी वनपाल सागर यादव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
मिळालेली माहिती अशी की
यातील तक्रारदार हे शेतक-यांच्या शेतातील झाडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता रुंदीकरणात बाधीत असणारी झाडे टेंडर मार्फत तोडणीसाठी घेवून ती विकीचा व्यवसाय करतात.त्यासाठी वनखात्याकडे अर्ज सादर करुन आवश्यक असणारी परवानगी घेत असतात. आजरा तालुक्यातील राज्य हदद रस्ता क. प्रजिमा क. ६३ चे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असल्याने सदर रस्त्यात बाधीत होणारी झाडे तोडण्यासाठीचा लिलाव सार्वजनिक बांधकाम विभाग गडहिंग्लज यांचे मार्फत काढण्यास आलेला लिलाव अर्जदार यांना मिळाला आहे.
त्यामुळे अर्जदार यांनी वन परिक्षेत्र कार्यालय आजरा येथील बाधीत झाडे तोडण्यासाठी व वाहतुकीसाठी आवश्यक त्या कागद पत्रासह दिनांक २८/०४/२०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी परिमंडळ वन अधिकारी कार्यालय गडहिंग्लज येथे आल्याचे समजल्याने तकारदार हे दिनांक २९/०४/२०२५ रोजी अर्जाचे पुढे काय झाले याची चौकशी करणेकरिता परिमंडळ वन अधिकारी कार्यालय, गडहिंग्लज येथे गेले असता तेथील वनपाल सागर यादव यांनी तुझ्या अर्जाची चौकशी करुन अहवाल मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी ६००० हजार रुपये मला द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांचेकडे ६००० हजार रुपयेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर कार्यालयाकडे वनपाल सागर यादव हे लाच मागत असलेबाबात तकार दिली आहे.तकारदार यांनी दिलेल्या तकारी प्रमाणे परिमंडळ वन अधिकारी गडहिंग्लज या ठिकाणी पंच साक्षीदारांचे समक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणीमध्ये सागर यादव यांनी तकारदार यांचेकडे काम करुन देणेकरिता ६,००० हजार रुपयें लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५,००० हजार रुपये ची लाच रक्कम देण्यास सांगितलेचे पडताळणीमध्ये निष्पन्न झालेने वनपाल सागर पांडुरंग यादव वय ४३, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ रा.हासूर दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द गडहिंग्लज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरु आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, सहाय्यक फौजदार अजय चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल घोसाळकर, पोलिस नाईक सचिन पाटील, संदिप पवार, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील ,चालक सहाय्यक फौजदार गजानन कुराडे, चालक पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:01 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!