नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहाद्यातील क्रीडासंकुलातून कोट्यवधींच्या साहित्यांची चोरी क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी

संबंधित प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे

नंदुरबार

: शहादा येथील नागरिकांना व मुलांना क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून तालुका क्रीडा संकुल योजनेअंतर्गत शहरात साधारणता सुमारे एक तपापूर्वी एक कोटी रुपये खर्चून बांधलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था क्रीडा विभागाच्या अनास्थेमुळे भयावह झाली आहे. क्रीडा संकुल आवारातील लाखो रुपयांचे साहित्य अनेक वर्षांपासून चोरीस गेले आहे. त्याबाबत शहादा पोलिसात साधी तक्रारही दाखल करण्याची तसदी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने शासनाला कोट्यावधींच्या चुना लागल्याचे समोर येत आहे.

शासनाने तालुका स्तरावर क्रीडा सुविधा उभारण्यासाठी तालुका क्रीडा संकुल ही योजना राबवली होती त्यानुसार शहादा तालुका क्रीडा संकुलासाठी शहादा नगर परिषदेमार्फत त्यांच्या हद्दीतील सर्वे नं. २२९ चे क्षेत्र एक हेक्टर पाच आर भूखंड उपलब्ध करून दिला आहे. या उपलब्ध भूखंडावर ५ जुलै २०१२ च्या तालुका क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत संकुल अंतर्गत विविध क्रीडा सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचेही ठरले. त्यानुसार येथे कोट्यावधींची इमारतीचे बांधकामही झाले. थाटात इमारतीचे लोकार्पणही तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु आज पर्यंत येथे कोणत्याही क्रीडा सुविधेचा लाभ न मिळता अवैध बाबींसाठी ही इमारत कुरणच ठरल्याचे स्थानिक रहिवाशी सांगतात.
इमारत बांधल्यानंतर संपूर्ण जागेला सुरक्षा भिंतही बांधण्यात आली. सुरक्षा भिंतीला मजबूत लोखंडी जाळ्या व मुख्य गेट बसवण्यात आले परंतु सर्व साहित्य लोखंडी असल्याने अज्ञात चोरट्यांनी हळूहळू करत सगळे साहित्य लंपास केले. जबाबदार अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अद्याप पर्यंत साधा अर्जही पोलीस ठाण्यात दिला नसल्याने शासनाला लाखो रुपयांच्या चुना लागला आहे. क्रीडा विभागासाठी आलेले पैसे सारे पाण्यातच गेल्याचे या घटनेतून समोर येत आहे. दरम्यान शासनाची कोट्यावधींची मालमत्ता बेवारस स्थितीत पडून असल्याने क्रीडा विभागाने इमारत ना कोणाकडे हस्तांतरित केली ना साधा सुरक्षारक्षक ठेवला नसल्याने अज्ञात चोरट्यांचे फावते अशातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरकृत्य होत असल्याने स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:37 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!