नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जयसिंगपूर पोलीस गुन्हे शोध पथकाने कर्नाटकातील दोन सराईत आरोपीना केले जेरबंद.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- सचिन कोळी

जयसिंगपूर:- जयसिंगपूर राजीव गांधीनगर येथील राजू लक्ष्मण गोसावी यांच्या मालकीच्या चिपरी बेघर वसाहतीतील आर जी ट्रेडर्स स्क्रॅप मर्चंट दुकानातील 225किलो कॉपर धातू व मोटार सायकल चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याअनुषंगाने शोध तपास कार्य करत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार जयसिंगपूर MIDC येथील अकिवाडे इंडस्ट्रीज परिसरात दोन इसम सिल्वर रंगाची चारचाकीत कॉपर धातूचा मुद्देमाल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती जयसिंगपूर पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून तपास केला असता दोन संशयित वरील चोरीच्या मुद्देमालासह सापडले. चौकशीअंती त्यांची नावे मुकेश गणपती गोसावी उर्फ जाधव, उमेश गणपती गोसावी जाधव मूळ रा बदर गल्ली, पिरनवाडी ता खानापूर बेळगाव कर्नाटक येथील दोघे आरोपी सक्खे भाऊ असल्याचे निष्पन्न झाले.
सिल्वर रंगाच्या वॅगणार MH02 AK 3188 चारचाकीत अंदाजे 225 किलो कॉपर धातूचे बंडल आढळून आले. व सदरील चोरी ही आर जी ट्रेडर्स स्क्रॅप मर्चंट येथून केल्याचे आरोपीनी कबूल केले.
यापूर्वी ही या दोन आरोपीवर विविध गुन्हे नोंद असून कुपवाड, विश्रामबाग सांगली, शिरोळ, हातकणंगले, शिवाजीनगर, मुरगूड पोलीस ठाणे कोल्हापूर आणि अलिबाग, खालापूर रायगफ येथे या सराईत आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. दोन्हीही आरोपीना तपासकामी ताब्यात घेतले असून चौकशीअंती अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जयसिंगपूर पोलीस गुन्हे शोध पथकाने वर्तवली आहे.
वरील शोध पथकाने 225 किलो कॉपर धातू व चारचाकी वाहन असा 3,30,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अवघ्या 8 तासात कॉपर धातू चोरीचा छडा लावल्याने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, अंमलदार ताहीर मुल्ला, अभिजित भातमारे, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!