नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धक्कादायक! पत्रकाराच्या चेहऱ्याआड लपलेला भेसूर चेहरा

* ब्लॅकमेल करत विवाहितेवर वारंवार अत्याचार
* गुन्हा दाखल; आरोपी फरार

* ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी –

भिवापूर :- समाजाच्या आरशात प्रामाणिकपणाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भिवापूर येथे उघडकीस आली आहे. कथित पत्रकार आनंद पूनमचंद गुप्ता 52 (रा. तास कॉलनी, भिवापूर) याच्यावर एका विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याचा व तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती आनंद गुप्ता याच्या ‘तवेरा’ गाडीवर चालक म्हणून काम करत होता. याच दरम्यान आरोपीने महिलेशी जवळीक साधली. पती घरात नसताना संधी साधत गुप्ताने तिच्यावर बळजबरी केली व नंतर तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. भीतीने गप्प बसलेली महिला त्यानंतर सतत अत्याचाराला बळी पडत होती.
गुप्ताची विकृत प्रवृत्ती यावरच थांबली नाही. त्याने महिलेसोबतचे व्हिडीओ व अश्लील संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरूच ठेवली. महिला त्याच्या जाळ्यात सापडत राहिली. घरी बोलावणं, घरी येणं, धमकी आणि अत्याचार, हे विकृत चक्र महिनोन्महिने सुरू होतं.
शेवटी या नराधमाचा छळ सहन न झाल्याने आज पीडित महिलेने आपल्या पतीसह पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. भिवापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत लिंगपिसाट आनंद गुप्ताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 एम, 76, 77 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. समाजमन हादरवणाऱ्या या घटनेमुळे पत्रकारितेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अशा विकृत वृत्तीच्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा मिळावी, असे मत येथे व्यक्त केले जात आहे.

—> अन्यायाच्या 13 वर्षांचा अखेर विस्फोट; आनंद गुप्तावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मागील 13 वर्षांपासून आरोपी आनंद गुप्ता याच्या अन्याय, अत्याचाराचा सामना करत असलेल्या 30 वर्षीय पिडीत महिलेला अखेर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पीडित महिला ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यामुळे गुप्तावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (SC/ST Atrocities) कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पोलीस यासंदर्भात गंभीरतेने चौकशी करत असून, लवकरच ठोस कारवाई होण्याची चिन्हं आहेत.

—-> पत्नीचा संयम सुटला; विकृत आनंद गुप्ताविरोधात पोलिसात तक्रार

विकृत मानसिकतेच्या आणि वर्तणुकीने हैराण करणाऱ्या आनंद गुप्ताच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याची पत्नी पुढे सरसावली आहे. पतीचे अवैध संबंध उघड झाल्यानंतर संतापलेल्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी थेट पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावत तक्रार दाखल केली. या धक्कादायक प्रकरणाची पोलीस तपासणी सुरू असून, एकूणच गुप्ताच्या वर्तनाचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

—> अश्लील ऑडिओ क्लिपची चर्चा; पोलिसांकडून तपास सुरू

भिवापूर परिसरात काही अश्लील ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. या क्लिपमध्ये एक पुरुष एका महिलेशी अत्यंत अश्लील व घाणेरड्या भाषेत संवाद करत असल्याचे ऐकायला मिळते. सदर ऑडिओ क्लिप आरोपी आनंद गुप्ता याने रेकॉर्ड करुन समाजमाध्यमांवर मुद्दाम प्रसारित केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भिवापूर पोलीस तपास करत असून, क्लिपच्या मूळ स्त्रोताचा शोध घेतला जात आहे.

—> नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या एका हिंदी दैनिकात स्थानिक प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या आनंद गुप्ता याला त्याच्या कथित गैरप्रवृत्तींची माहिती समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी संस्थेने बाहेरचा रस्ता दाखविल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या वर्तनाबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

—-> पत्नीचा संयम सुटला; विकृत आनंद गुप्ताविरोधात पोलिसात तक्रार

विकृत मानसिकतेच्या आणि वर्तणुकीने हैराण करणाऱ्या आनंद गुप्ताच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याची पत्नी पुढे सरसावली आहे. पतीचे अवैध संबंध उघड झाल्यानंतर संतापलेल्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी थेट पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावत तक्रार दाखल केली. या धक्कादायक प्रकरणाची पोलीस तपासणी सुरू असून, एकूणच गुप्ताच्या वर्तनाचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

—> आनंद गुप्ताविरुद्ध रस्त्यावर उतरले वाहनचालक; संघटनेचा ठाम पाठिंबा पीडितेला

अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या आनंद गुप्ताविरोधात केवळ पीडिता नव्हे, तर आता शहरातील वाहनचालकही रस्त्यावर उतरले आहेत. पीडित महिलेचा पती स्वतः वाहनचालक असल्याने, संपूर्ण वाहन चालक संघटना तिच्या पाठीशी उभी ठाकली आहे. पोलिसात तक्रार दाखल करताना संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पीडित जोडप्यासोबत उपस्थित होते. “आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:50 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!